Friday, March 27, 2026
Home टेलिव्हिजन Valentine Day Special | अनुजची २६ वर्षांची प्रतीक्षा संपणार, अनुपमा करणार तिचे प्रेम व्यक्त!

Valentine Day Special | अनुजची २६ वर्षांची प्रतीक्षा संपणार, अनुपमा करणार तिचे प्रेम व्यक्त!

स्टार प्लस वाहिनीवरील शो ‘अनुपमा‘ने अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे. दर आठवड्याला हा शो टीआरपीच्या यादीत टॉप सीरियलमध्ये येतो. शोमध्ये येणाऱ्या ट्विस्ट आणि टर्न्समुळे या शोबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता कायम आहे. या मालिकेतील अनुपमा, वनराज, अनुज कपाडिया आणि काव्या या पात्रांना खूप प्रेम मिळत आहे. चाहत्यांना शोची कथा खूप आवडते. हा शो ४० पेक्षा जास्त वयाच्या प्रेमावर आधारित आहे. शो सर्वांच्या पसंतीस उतरावा यासाठी मेकर्स कथेत ट्विस्ट आणत राहतात. त्यामुळे प्रेक्षक या शोशी जोडलेले राहतात. शोमध्ये अनुज आल्यापासून अनेक ट्विस्ट आले आहेत. अनुपमा गांगुली तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अनुज आणि अनुपमा एकत्र अडचणींचा सामना करत आहेत. आता या शोमध्ये एक ट्विस्ट येणार आहे. हे पाहिल्यानंतर चाहत्यांना खूप आनंद होणार आहे. अनुपमामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे. अनुज आणि अनुपमा हा दिवस एकत्र साजरा करणार आहेत.

व्हॅलेंटाइन वीकमध्ये शोमध्ये एक सेलिब्रेशनही होणार आहे. शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अनुपमा आणि अनुज एकत्र दिसत आहेत. प्रोमो पाहून असे म्हणता येईल की, अनुजची २६ वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. अनुपमा तिचे प्रेम व्यक्त करणार आहे.

रुपाली गांगुलीने शेअर केला व्हिडिओ
शोमध्ये अनुपमा आणि अनुजचा रोमँटिक ट्रॅक प्रेक्षकांना आवडत आहे. शोचा प्रोमो शेअर करताना रुपाली गांगुलीने लिहिले की, “फेब्रुवारी महिना फॅब असणार आहे. अनुपमाच्या आयुष्यातील पहिला व्हॅलेंटाईन डे. तो विशेष असेल. तुम्हाला काय हवे आहे हे मला जाणून घ्यायचे आहे आणि अनुपमा आणि अनुजच्या व्हॅलेंटाईन डेबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा एक उत्साही वीकेंड असणार आहे.”

व्हिडिओमध्ये अनुपमा लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. तिचा मेकओव्हर करण्यात आला आहे. तर अनुज काळ्या रंगाची पॅन्ट आणि शर्टमध्ये दिसत आहे. त्यांना पाहून ‘कुछ कुछ होता है’ मधील राहुल आणि अंजलीची आठवण होत. आहे. व्हिडिओ पाहून असे म्हणता येईल की, आता अनुपमा अनुजवर तिचे प्रेम व्यक्त करणार आहे. व्हॅलेंटाइनच्या खास दिवशी हे घडणार आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा