Saturday, July 6, 2024

अनुराग बासूंनी केली बिग बींची नक्कल; ‘सुपर डान्सर ४’मध्ये खेळण्यात आला ‘हा’ खेळ

सध्या टीव्हीवर चर्चेत असलेला डान्सिंग रियॅलिटी शो म्हणजेच ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ होय. या शोमध्ये शनिवारच्या (२१ ऑगस्ट) एपिसोडमध्ये अमर चित्र कथा स्पेशलद्वारे प्रेक्षकांना आपल्या छोट्या पडद्यावर शानदार व्हिज्युअल ट्रीट पाहायला मिळाली. सुपर डान्सरच्या मंचावर स्पर्धक ईशा सिंग आणि सुपर गुरू सोनालीने द्रौपदीच्या अमर चित्रकथेचे शानदार सादरीकरण केले. त्यांचे हे सादरीकरण पाहून तिन्ही परीक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूर हैराण झाले.

सुपर डान्सरच्या प्रत्येक एपिसोडमध्ये दिल्लीच्या ईशा सिंग आणि तिची गुरू प्रत्येक आठवड्यात आपल्या डान्सने परीक्षकांना प्रभावित करत आहेत. ईशाच्या जेवणाबाबत अनुराग बासू नेहमीच प्रँक खेळतात. (Anurag Basu Copied Actor Amitabh Bachchan Koun Banega Crorepati Played Quiz Show In Super Dancer Chapter 4)

ईशाच्या आजच्या परफॉर्मन्सनंतर तिचा डान्स पाहून गीता कपूर इतक्या उत्साहित झाल्या की, त्या म्हणाल्या, “खतरनाकम, विशेषम, सर्वश्रेष्ठम, अति उत्तम, अति उत्तम… हे खरंच अप्रतिम सादरीकरण होते. हा तुझ्या सर्वोत्तम परफॉर्मन्सपैकी एक आहे. हा परफॉर्मन्स पूजा करण्यासमान आहे.” इतकेच नाही, तर गीता कपूर यांनी ईशा आणि तिची सुपर गुरू सोनालीला आपल्या जवळ बोलावून त्यांची गळाभेट घेतली.

शिल्पा शेट्टीने केली खूप प्रशंसा
गीता कपूरच नव्हे, तर सुपर डान्सरमध्ये जवळपास एक महिन्यानंतर परतलेली परीक्षक शिल्पा शेट्टीनेही ईशाची प्रशंसा केली. ती म्हणाली की, “तुम्ही दोघी ज्याप्रकार परफॉर्म करत आहात, ते सुपर्रर्रर्रर्रपेक्षा खूप खूप उपर्रर्रर्र आहे. ईशा आज तू माझ्यासोबत सीढी चढण्याची हक्कदार आहेस.”

गीता आणि ईशानंतर जेव्हा अनुराग बासूंची वेळ आली, तेव्हा त्यांनी ईशासोबत सोमवारी (२३ ऑगस्ट) ऑन एअर होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ प्रमाणे ‘किसको मिलेगा खाना’ नावाचा खेळ खेळला. यामध्ये अमिताभ बच्चन यांची अनुराग बासू यांनी नक्कल केली. अमिताभ यांची जागा अनुराग दा यांनी घेतली आणि हॉट सीटवर ईशा आणि स्पर्धकाचे वडील यांना बसवण्यात आले.

कोणी केले सर्वाधिक जेवण?
खरं तर सुपर डान्सरचा स्पर्धक अमितच्या वडिलांनी ईशाला चॅलेंज करत म्हटले की, ते सर्वात जास्त फूडी (सर्वाधिक जेवणारे) आहेत. अशामध्ये अनुराग यांनी ‘किसको मिलेगा खाना’ नावाचा खेळ खेळण्याचा निर्णय घेतला. या खास खेळात खूपच रंजक लाईफलाईन्स ठेवण्यात आल्या होत्या. जसे की, ‘फ्लिप द डिश’, ‘आस्क द शेफ’ आणि ‘उत्तर कानात सांगा’ यांसारख्या अजब लाईफलाईन्स सह हा खेळ सर्वांनी एन्जॉय केला तसेच खूप मस्ती केली. तरीही या स्पर्धेत स्पर्धकांपेक्षा होस्ट बनलेल्या अनुराग बासू यांनी सर्वाधिक जेवण केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘खिलाडी’ अक्षयमुळे उडाली कपिलची झोप; म्हणाला, ‘मी तर झोपलो नाही, प्रेक्षकांमधील काही लोक टॉयलेटसाठीही…’

-बिकिनी परिधान करून ज्यूस काढताना दिसली जान्हवी कपूर; मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट

-जेव्हा गाणे गाताना अचानक ओरडली मिताली, पाहुन सिद्धार्थही झाला स्तब्ध; मग पुढे…

हे देखील वाचा