अनुराग डोभाल हा एक युट्यूबर आहे. तसेच बिग बॉस 17 मध्येही दिसला होता. तर अनुराग डोभाल, ज्याला यूके07 रायडर म्हणूनही ओळखले जाते. अलीकडेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आला. युट्यूबरने अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आणि कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण होताच अजून एक व्हिडिओ सात मार्च रोजी आला तो म्हणजे अनुराग डोभाल याच्या अपघाताचा तो व्हिडिओ होता. तरी त्याच्या अपघातानंतर रुग्णालयात भेटण्यासाठी त्याची पत्नी आली होती आणि ती खूप रडत होती, आणि या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय
अपघाताच्या काही दिवस आधी अनुरागने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर दोन तासांचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने त्याच्या मानसिक स्थिती, नैराश्याबद्दल उघडपणे सांगितले होते. ज्यामध्ये, त्याने धक्कादायक दावा केला होता की त्याच्या कुटुंबाशी, विशेषतः त्याच्या पालकांशी, भावाशी सुरू असलेल्या वादांमुळे त्याने अनेक वेळा आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. अनुरागने आरोप केला होता की त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले होते.
अनुरागच्या (anurag)सध्याच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा आणि बनावट व्हिडिओ फिरत आहेत. अनुरागच्या मॅनेजरने या चुकीच्या माहितीवर उपाय म्हणून अधिकृतपणे पुढाकार घेतला आहे. सोमवारी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, मॅनेजरने सांगितले की अनुरागला ऑपरेशन रूममध्ये नेण्यात आले आहे, जिथे तो फ्रॅक्चरसाठी उपचार घेत आहे. त्यांनी स्पष्ट केले की रितिका आणि इतर जवळचे कुटुंबीय रुग्णालयात अनुरागसोबत आहेत. मॅनेजरने काही व्ह्यूजसाठी खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सवर कडक टीका केली. “आमची पहिली प्राथमिकता अनुरागचे आरोग्य आणि पुनर्प्राप्ती आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










