Tuesday, July 9, 2024

अरेरे! कोट्यवधी रुपयांचे सिनेमे तयार करणाऱ्या दिग्दर्शकाच्या मुलीला तीन दिवसाचं राशनही नव्हतं परवडत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि सिनेमा एडिटर आरती बजाज हे जोडपे वेगळे झाले आहेत. मात्र, त्यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव आलिया कश्यप असे आहे. आलिया ही सिनेमात काम करत नसली, तरीही ती एक युट्यूबर आहे. तिचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. आलिया युट्यूबवर तिचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. या व्हिडिओमध्ये ती आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून ते सेक्स, रिलेशनशिप आणि फिटनेसपर्यंत सर्व गोष्टींबद्दल चर्चा करत असते. अशात आलियाने तिचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने सांगितले आहे की, तिने एकेकाळी कशाप्रकारे आर्थिक समस्यांचा सामना केला होता.

आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) हिने तिची सहकारी एन्फ्लुएंसर साक्षी शिवदासानी (Sakshi Shivdasani) हिच्यासोबत एक युट्यूब व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओत दोघीही ‘ट्रूथ आणि ड्रिंक’ (Truth Or Drink) हा गेम खेळत आहेत. या गेमदरम्यान आलियाने तिच्या त्या काळाबाबत सांगितले, जेव्हा तिच्या अकाऊंटमध्ये फक्त १५०० रुपये असायचे आणि ती घरातील वस्तूही विकत घेऊ शकत नव्हती.

या व्हिडिओत आलिया आणि साक्षी चाहत्यांच्या प्रश्नांची एकेक करत उत्तरे देत आहेत. चाहत्यांनी त्यांना त्यांच्या आयुष्यापासून ते रोमँटिक क्षण, तंदुरुस्तीमुळे आलेली चिंता आणि पैशांपर्यंत प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारले. एका चाहत्याने विचारले की, “तुमचे पालक घरी गेल्यानंतर तुम्हाला पैशांची तंगी जाणवते का?”

या प्रश्नाचं उत्तर देताना आलिया कश्यप म्हणाली की, “मी साक्षीला भेटल्यानंतर याबाबत सांगितले होते. माझ्या अकाऊंटमध्ये फक्त १५०० रुपये होते. मी त्यांना माझा बँक बॅलेंस दाखवला होता आणि म्हटले होते की, ‘मला काहीच खरेदी करता येत नाहीये.’ बरं झालं दोन दिवसांनंतर माझा पगार झाला होता. मात्र, ३ दिवसांपर्यंत माझ्या अकाऊंटमध्ये फक्त १५०० रुपयेच होते.” यावर साक्षी शिवदासानी हिने सांगितले की, तिच्यासोबतही असेच काहीसे झाले होते आणि ती त्यावेळी खूपच त्रासात होती.

आलियाने पुढे बोलताना म्हटले की, “ते खूपच त्रासदायक होते. मी आपल्या घराबाहेर जायचे बंद केले होते. कारण, मी काहीच खरेदी करू शकत नव्हते. मला त्या पैशांसोबत श्वास घेणेही परवडत नव्हते. हे खूप कठीण होते. मला आपल्या आईला माझ्यासाठी जेवण पाठवण्यासाठी सांगावे लागायचे. कारण, मला तीन दिवसांपर्यंत घरातील राशन आणणेही परवडत नव्हते. तो खरंच चांगला काळ नव्हता. मी पुन्हा असं कधीच करणार नाही.”

आलियाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर ती बॉयफ्रेंड शेन ग्रेगोअर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघेही एकमेकांना २ वर्षांपासून डेट करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘खूपच वेदनादायक होते ते सेक्स सीन्स’, म्हणत अभिनेत्री डकोटा जॉनसनने सांगितली शूटिंगची धक्कादायक कहाणी

नव्वद वर्षांपूर्वी ४ मिनिटांच्या ‘त्या’ किसिंग सीनने झालेला गोंधळ

हेमा मालिनी ४० वर्षात का भेटल्या नाही धर्मेंद्रंच्या पहिल्या पत्नीला?

हे देखील वाचा