Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड अनुराग कश्यपने सलमान खानला दिलेला ‘तो’ सल्ला पडला होता त्याला महागात

अनुराग कश्यपने सलमान खानला दिलेला ‘तो’ सल्ला पडला होता त्याला महागात

बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. अनुरागने नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये स्टार्सपेक्षा अधिक कलाकारांमधील प्रतिभेला प्राधान्य दिले. नेहमीच आपली मत स्पष्टपणे समोर ठेवण्यात मागे पुढे पाहत नाही. नुकताच अनुरागचा ‘आलमोस्ट प्यार विद डीजे मोहब्बत’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्याने सलमान खानच्या तेरे नाम सिनेमाच्या संदर्भातील एक किस्सा सर्वांना सांगितला. सलमान खानला त्याने सल्ला दिला जो त्याला चांगलाच महागात पडला होता.

अनुराग कश्यपने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. एक उत्तम आणि अभ्यासू व्यक्तीमत्व आणि दिग्दर्शक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. अनुरागला सलमान खानचा ‘तेरे नाम’ दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली होती. अनुराग या सिनेमाचे स्क्रिप्टिन्ग आणि दिग्दर्शन करणार होता. मात्र एका रात्रीत त्याला हा सिनेमा गमवावा लागला होता.

Salman-Khan
Photo Courtesy Instagrambeingsalmankhan

तेरे नाम सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अनुरागने सलमान खानला त्याच्या छातीवरचे केस वाढवण्याचा सल्ला दिला होता. आपल्या छातीवर केस वाढवण्याचा सल्ला त्याला अजिबात रुचला नाही. त्यानंतर त्याने अनुरागला या सिनेमातून काढून टाकले आणि सतीश कौशिक यांना दिग्दर्शक म्हणून ठेवले. अनुरागच्या मते चित्रपटाचा हिरो हा आग्रा मथुरेचा होता. अनुराग स्वतः यूपीचे असल्याने ते सलमानला यूपीच्या मुलाच्या भूमिकेत बघू शकत नव्हते. सलमानला सिनेमातून काढणे म्हणजे तुम्हीच विचार करू शकता. म्हणून त्याने सलमानला सल्ला देण्याचा विचार केला. मात्र हा सल्ला त्याला चांगलाच महागात पडला.

या प्रमोशन दरम्यान त्याने हे देखील सांगितले की लॉकडाऊनच्या काळात तो नोरा फतेहीचा डान्स पाहून तिचा फॅन झाला होता. त्याने तिचे अनेक रिल्स पाहिले. सध्या तो फूड रिल्स बघत असून, त्याच्या दृष्टीने नोराची क्रेझ कमी झाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शेखर सुमनने प्रियंका चौधरी अन् एमसी स्टॅनवर केला रॅप, स्पर्धक हसून हसून लाेटपाेट

सुकेशने तुरुंगातून पुन्हा लिहिले पत्र; म्हणाला, ‘मी चाहत खन्नासारखा गोल्ड डिगर …’

हे देखील वाचा