Monday, October 13, 2025
Home बॉलीवूड अनुष्का अन् विराटच्या लग्नात चिक्कार पैसा केला होता खर्च, इटलीत पार पडलेल्या लग्नसोहळ्यात आले होते ‘इतके’ कोटी बिल

अनुष्का अन् विराटच्या लग्नात चिक्कार पैसा केला होता खर्च, इटलीत पार पडलेल्या लग्नसोहळ्यात आले होते ‘इतके’ कोटी बिल

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे एक लोकप्रिय जोडपे आहे. नात्यात बरेच चढउतार सहन करून, हे जोडपे आता सुखी संसार करत आहे. त्यांच्या लव्हस्टोरीपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत सर्व काही बऱ्याच चर्चेत राहिले आहे. खुल्लम खुल्ला प्रेम जाहीर करणाऱ्या या जोडप्याने, लग्न मात्र अतिशय खासगी पद्धतीने केले. विशेष म्हणजे नुकताच शनिवारी (१ मे) अनुष्काने आपला ३३ वा वाढदिवस साजरा केला. चला तर मग यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या लग्नाबद्दल काही खास गोष्टी…

इटलीमध्ये पार पडला विवाहसोहळा
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी सन २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांनी इटलीमध्ये आपल्या कुटुंबीयांसह आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीमध्ये लग्न उरकून घेतले. अवघ्या काही लोकांमध्ये पार पडलेल्या या लग्नसोहळ्यामध्ये कोटींचा खर्च झाला होता.

अनुष्काने परिधान केला होता सब्यसाचीचा लेहंगा
प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की, आपल्या लग्नात ती सर्वात सुंदर दिसावी. यात पण मुलींचा भर असतो तो कपड्यांवर. अनुष्काचे नाव तर बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणले जाते. अशामध्ये, लग्नाचा लेहंगा हटके असणारच होता. अनुष्काने आपल्या लग्नात सब्यसाचीचा लेहंगा परिधान केला होता.

कमी पाहुण्यांमध्ये पार पडला सोहळा
विरुष्काने आपला विवाहसोहळा अगदी खासगी ठेवला होता. त्यामुळे त्यांनी लग्नात फक्त काही ठराविक लोकांना आमंत्रित केले होते. त्यांच्या लग्नात केवळ कुटुंबातील काही सदस्य आणि त्यांची खास मित्रमंडळी उपस्थित होती.

लग्नात झाला होता ५० कोटींचा खर्च
बरेच दिवस डेट केल्यानंतर, विरुष्का लग्नबंधनात अडकले. मात्र, क्वचितच लोकांना माहिती असेल की, विरुष्काच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नात अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. कमी पाहुण्यांमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात तब्बल ५० ते ५५ कोटींचा खर्च झाला होता.

व्हायरल झाले होते फोटो
विरुष्काच्या लग्नात एका सेलिब्रिटी फोटोग्राफरने फोटो क्लिक केले होते. हे फोटो बघता बघताच सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते.

गोंडस मुलीचे पालक बनले आहेत विरुष्का
याच वर्षी अनुष्का आई बनली आहे. तिने २०२१ सालच्या जानेवारी महिन्यात ११ तारखेला एका गोंडस मुलीला जन्म दिला.

जोडप्याने आपल्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पहिलाच चित्रपट ठरला हिट, तर पुढे तिन्ही खानसोबत काम करायची मिळवली तिने सुवर्णसंधी; वाचा अनुष्का शर्माचा यशस्वी जीवनप्रवास

-जेव्हा मन्ना डे यांनी प्रेमिकेसाठी घातला होता वडिलांशी वाद; वडिलांनी ऐकलं नाही, तर आईने लाऊन दिले लग्न!

हे देखील वाचा