Saturday, July 6, 2024

‘मी करायचे म्हणून काम करणार नाही’ अनुष्का शर्माने चित्रपट करण्याबद्दल स्पष्ट केले तिचे मत

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अनुष्का शर्माला ओळखले जाते. अनुष्काने तिच्या करियरमध्ये अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. मागील काही काळापासून चित्रपटांपासून लांब ती तिचे मदरहूड एन्जॉय करत आहे. २०१७ साली क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतर २०२१ साली त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी तिचे नाव वामिका ठेवले असून, ती लाइमलाईटपासून खूप लांब आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनुष्काने तिच्या वैयक्तिक, व्यावसायिक अनेक गोष्टींबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या.

एका मुलाखतीमध्ये अनुष्काने तिच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल बद्दल सांगितले. सोबतच तिने हे देखील स्पष्ट केले की, काम आणि वामिकाला वेळ देणे ती कसे शक्य करते. २०२२ हे वर्ष तिच्या आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये गेले. त्यांनतर तिने तिचा पूर्ण वेळ वामिकाला दिला आहे. तिला रात्रीचे जेवण भरवून तिचे सर्व काम अनुष्का करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने सांगितले की, “मी अजून जास्त सिनेमे करायला तयार आहे, मात्र तेव्हाच जेव्हा मी वेळ काढू शकते. मी केवळ बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी एका पाठोपाठ एक सिनेमे करू इच्छित नाही. मला या सर्व बाबतीत माझी मत स्पष्ट आहेत. उत्तम सिनेमे असतील तर मी ते नक्कीच करेल. मात्र करायचे म्हणून काम मी करणार नाही.” वामिकाबद्दल बोलताना ती म्हणाली, “मला तिच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडते. तिचा आणि माझा बॉन्ड खूप खास आहे. मी तिची सर्व कामं आनंदाने करते.” अनुष्काने तिच्या या मुलाखतीमध्ये बॉलिवूडमध्ये चित्रपट करण्याबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने नुकतीच ‘कला’मध्ये बाबील खान आणि तृप्ती डमरीसोबत पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली होती. लवकरच ती चकदा एक्सप्रेस सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा झुलन गोसवमि यांच्यावर आधारित असून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. यासोबतच ती अनेकदा विराट आणि वामिकासोबत देशातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देताना दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री सुश्मिता सेन हिने सांगितला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा रंजक किस्सा म्हणाली, ‘मला तेव्हा एवढी….,’
oscars 2023 live stream: RRR ला अवॉर्ड जिंकताना बघायचे आहे? ऑस्कर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या

हे देखील वाचा