Tuesday, July 9, 2024

लाइमलाईटपासून दूर नदी किनारी ध्यान करताना दिसली अनुष्का शर्मा, ऋषिकेशमध्ये कुटुंबासोबत घालवते वेळ

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे त्यांच्या मुलीसह सध्या एक अध्यात्मिक यात्रेवर आहे. त्यांच्या या यात्रेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्का आणि विराट सध्या ऋषिकेशच्या दौऱ्यावर असून ते त्यांची सुट्टी एन्जॉय करत आहे. ऑस्ट्रलियाच्या विरोधात कसोटी सामन्यांच्या आधी मिळालेल्या सुट्टीदरम्यान विराट आणि अनुष्का या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. या दरम्यान दोघेही स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात गेले होते. याच दरम्यान अनुष्काने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नदीच्या काठावर बसून, मेडिटेशन करताना दिसत आहे. अतिशय शांत आणि फ्रेश वातावरणात ती ध्यान करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “काय तुम्हाला दिसत नाही सगळे एकदम परफेक्ट आहे.” अनुष्का शर्मा तिचे आलिशान जीवन सोडून नदीच्या किनारी ध्यानाला बसलेली पाहून नेटकऱ्यांना आणि तिच्या फॅन्सला खूप अप्रूप वाटत आहे.

सध्या विराट कोहली अनुष्का शर्मा आणि आई सरोज कोहलीसोबत ऋषिकेशला गेला असून, तिथे तो वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत आहे. हे पहिल्यांदाच नाही तर यावर्षीच्या सुरुवातीपासूनच विराट आणि अनुष्का सतत देशातील वेगवगेळ्या धार्मिक ठिकाणांना भेटी देत आहेत. याआधी ते वृंदावन, मथुरा , मथुरा मधील बाबा नीम करोली यांचा आश्रम इथे गेले होते. त्यांच्या या यात्रेचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विविध आश्रमात भेट देत त्यांनी साधू संत महात्म्यांचे आशीर्वाद घेतले.

सध्या ऋषिकेशमध्ये विराट, अनुष्का आणि सरोज कोहली यांनी स्वामी साक्षातकृता नंद महाराज यांचा आशीर्वाद घेतला. त्या आश्रमात जाऊन त्यांनी रात्री मुक्काम देखील केला. यासोबतच त्यांनी त्याच आश्रमात जेवण देखील केले. त्यांचा हा साधेपणा पाहून सर्वच फॅन्स चांगलेच खुश आहे.

तत्पूर्वी विराट कोहलीने यावर्षीच्या सुरुवातीलाच दोन शतकं ठोकत दमदार सुरुवात केली आहे. आता तो ऑस्ट्रेलिया सोबत होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये खेळताना दिसेल. ही सिरीज ९ फेब्रुवारीपासून सुरु होईल. तर अनुष्का शर्मा लवकरच तिच्या आगामी चकदा एक्सप्रेस सिनेमात क्रिकेटरच्या भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘प्रेम स्वाभाविक नाही’, म्हणत नागराज मंजुळे यांनी सांगितला त्यांच्या पहिल्या प्रेमाचा भन्नाट किस्सा
पार्टीतून बाहेर येताच पॅपराझींना पाहून लाजली जान्हवी; पाहा कोण व्यक्ती होता अभिनेत्रीसोबत

हे देखील वाचा