Saturday, June 29, 2024

विरुष्काच्या मुलीचे नाव जाहीर झाल्यानंतर आता ‘त्या’ नावाचा अर्थ आला जगासमोर

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे दोघं मागच्या महिन्यात एका मुलीचे आई, बाबा झालेत. त्यांना त्यांच्या या गोड बातमीमुळे सर्वच स्तरातून शुभेच्छा मिळाल्या, त्यांच्या फॅन्सने त्यांना शुभेच्छांसोबतच बाळाचा फोटो शेयर करण्याची विनंती देखील केली, पण त्यांनी त्यांच्या या महत्वाच्या आणि आनंदाच्याक्षणी फक्त परिवार आणि खाजगी आयुष्याला महत्व दिले. मात्र आता अनुष्काने आपल्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत अनुष्का आणि विराट त्यांच्या लाडक्या लेकीला प्रेमाने पाहत आहे. हा फोटो शेअर करुन त्यांनी त्यांच्या या लाडक्या मुलींचेही नावही जाहीर केले आहे.

आता अनुष्काने एक नवीन प्रेमाने ओतप्रोत असलेली पोस्ट शेयर केली आहे. तिच्या या पोस्टमध्ये पांढऱ्या रंगाचा एक घोडा असून त्याच्या समोर एक छोटे बाळ बसलेले दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले, ” तू कधी अशा माणसांना भेटला आहेस का, ज्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे?, मी तर अजूनपर्यंत अशा कोणत्याच व्यक्तीला नाही भेटली, ज्याने मेहनत केली नाहीये.”

याआधी अनुष्काने एक पोस्ट शेयर करत लिहिले होते की, “आम्ही प्रेम आणि कृतज्ञतेसह एकत्र राहिलो, मात्र या छोट्याशा वामिकाने याला एका नवीन उंचीवर आणले आहे. अश्रू, हसणे, चिंता, आनंदाच्या भावना आम्ही या क्षणी एकत्र जगलो आहोत. आमची झोप जरी उडाली असली, तरी मनं भरलेले आहे. आपल्या सर्वांच्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभारी आहोत,”

‘वामिका’ हे दुर्गा देवीचे एक नाव आहे. हे नाव संस्कृत शब्द वामा पासून तयार झाले आहे. या नावाचा अर्थ प्रेम, वैभवसंपन्न आणि हुशार स्त्री असा होतो. सोबतच काही फॅन्सने सोशल मीडियावर ‘वामिका’ नावातील व ( V ) हा विराटचा आणि का ( Ka ) अनुष्काचा असे ‘वामिका’ नाव तयार झाल्याचे देखील सांगितले आहे.

हेही वाचा- 

विश्वासच बसणार नाही! जास्त वयात आई बनलेल्या बॉलिवूड अभिनेत्री; एकीने तर ४३ व्या वयात दिला ३ मुलांना जन्म

पौर्णिमेचा चंद्र पाहताना थेट ढगातच गेली, ३४ वर्षीय गायिकेचा दुर्दैवी अंत; संगीत क्षेत्रावर शोककळा

हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या ऋतिकची वाट अडवणे मुलाच्या अंगलट; घेतला चांगलाच समाचार

हे देखील वाचा