Wednesday, July 3, 2024

‘स्वीटू’ अन् ‘परी’च्या मजेशीर फोटोची रंगलीय चर्चा; पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दोघीही दिसताय एकदम सुंदर

टेलिव्हिजनवर काही मालिका सध्या जोरदार चर्चेत आहेत. यातील झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिका टॉपला आहेत. या मालिकांमधील स्वीटूचा गोडवा आणि परीची निरागसता सगळ्यांनाच भावत आहे. अशातच स्वीटू आणि परीचा एक गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही मालिकेत ही पात्र अन्विता फलटणकर आणि बालकलाकार मायरा वैकुळ निभावत आहे.

अशातच अन्विताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा मायरासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. गुरुवारी (७ ऑक्टोबर) नवरात्रीला सुरुवात झाली आहे. दुर्गामातेचा आजचा रंग पिवळा आहे. त्यामुळे त्या दोघींनी पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. त्या दोघी अगदी गोड दिसत आहेत. तसेच दोघींनी अत्यंत मजेशीर पोझ दिली आहे. (Anvita faltankar and myra vaikul’s funny photo viral on social)

हा फोटो शेअर करून तिने “यल्लो जी,” असे कॅप्शन दिले आहे. तसेच मायराने याच ड्रेसमधील एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात ती म्हणते की, “तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा रंग आहे पिवळा.” तिच्या या व्हिडिओवर देखील तिच्या अनेक चाहत्यांच्या कमेंट केल्या आहेत.

सोशल मीडियावर मायराची फॅन फॉलोविंग भरपूर आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून तिला खूप ओळख मिळाली आहे. अवघ्या एक महिन्यात या चिमुकलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच अन्विताने या आधी ‘गर्ल्स’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘टाईमपास’ या चित्रपटात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती. परंतु आता झी मराठीवरील या मालिकेने खूप ओळख मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष

-देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा