Monday, July 1, 2024

‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

सध्याच्या काळात सर्वात चर्चित असणाऱ्या मालिकांपैकीच एक आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. ही मालिका पाहायला प्रेक्षक दररोज आवर्जून टीव्हीसमोर बसतात. यातील कलाकारांचा अभिनय आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ‘ओम’ आणि ‘स्वीटू’ची लव्हस्टोरी प्रेक्षकांना आता जवळची वाटू लागली आहे. गोड गोंडस अशी स्वीटू आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा ओम, हे दोघे चाहत्यांच्या मनावर गारुड घालून आहेत.

या जोडीचे रोमँटिक फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या फॅन पेजवरून यांचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. तर कधीकधी स्वीटू अर्थातच अन्विता देखील त्यांचे फोटो शेअर करताना दिसते. या जोडीचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडिओ थोडा ब्लर आहे, मात्र यात अन्विता आणि शाल्वला तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. यात अन्विताने पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे, तर शाल्वने करड्या रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातली आहे. या व्हिडिओमध्ये दोघे अतिशय मजेदार अंदाजात नाचताना दिसत आहे. यातील त्यांच्या डान्स स्टेप्स अगदी पाहण्यासारख्या आहेत. यावरून लक्षात येईल की, केवळ ऑनस्क्रीनच नव्हे, तर ऑफस्क्रीनही दोघांची केमिस्ट्री जबरदस्त आहे.

ओम आणि स्वीटूचा हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे की, “हे नक्की आपले शाल्विताच आहेत ना? की दुसरे कोणी??” सोबतच लाल हार्ट ईमोजी देखील बनवले आहेत. चाहते कमेंट सेक्शनमध्ये दोघांवर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. शिवाय या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे का? असंही कमेंटमध्ये बोललं जात आहे.

अन्विताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय करून, रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘गर्ल्स’ या चित्रपटात ती ‘रुमी’च्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय अन्विताने ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा