Saturday, April 19, 2025
Home मराठी ‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’

‘मला खुश राहायचंय’, म्हणत घराच्या छतावर पावसाळी वातावरणाचा आनंद लुटताना दिसली ‘स्वीटू’

गोड गोंडस रूप आणि निरागस व्यक्तिमत्त्व असलेली अन्विता फलटणकर चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत अभिनय करून, तिने रसिकांच्या मनावर गारुड घातलं आहे. शिवाय ती सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. या ठिकाणी ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही.

अन्विताचे सोज्वळतेने भरलेले फोटो तर तुम्ही अनेकदा पाहिलेच असतील. मात्र नुकत्याच समोर आलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीचा मनमोहन असा अंदाज पाहायला मिळाला आहे. या फोटोमध्ये तिच्या अदा पाहून कोणीही नव्याने तिच्या प्रेमात पडेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणे गोंडस दिसत आहे. (anvita phaltankar enjoying the rain and says i want to be happy)

या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, अन्विता पावसाळी वातावरणाचा दिलखुलास आनंद घेत आहे. अभिनेत्री घराच्या छतावर पावसात भिजताना दिसत आहे. शिवाय तिच्या हातात एक छत्रीही आहे. हा फोटो शेअर करत अन्विताने कॅप्शनही लिहिलंय की, “मला परफेक्ट नाही, तर आनंदी राहायचं आहे!” असं म्हणत तिने चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पाडलं आहे.

या फोटोवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. आतापर्यंत या फोटोवर १९ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. तर चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिचे कौतुक करत आहेत.

अन्विताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय करून, रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘गर्ल्स’ या चित्रपटात ती ‘रुमी’च्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय अन्विताने ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा