यावर्षी चंदेरी दुनियेतून अनेक गोड बातम्या येत आहेत. अनेक कलाकारांच्या घरात चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. अशातच बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आणि आयुष्मान खुरानाचा लहान भाऊ अपारशक्ती खुराना याच्या घरी देखील आनंदी-आनंद पसरला आहे. अपारशक्ती आणि त्याची पत्नी आकृती आहुजा यांना मुलगी झाली आहे. त्यांच्या आयुष्यातील हा अत्यंत सुंदर क्षण त्याने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अपारशक्तीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवरून ही गोड बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. तसेच त्याने इंस्टाग्रामवर देखील पोस्ट केली आहे. यासोबत मुलीचा जन्म होताच त्याने मुलीच्या नावाची घोषणा देखील केली आहे. त्याच्या मुलीचे नाव ‘आरझोई’ असे आहे. यासोबतच आयुष्मान खुराना याने देखील त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट करून घरात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे ही बातमी सांगितली आहे. (Aparshakti khurana blessed with baby girl, give information on social media)
अपारशक्तीने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकार त्याचे आणि त्याच्या पत्नीचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या चाहत्यांना देखील ही गोड बातमी वाचून खूप आनंद झाला आहे.
अपारशक्तीने काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीच्या डोहाळ जेवणाचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये आकृतीला आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब एकत्र आलेले दिसत होते. ते दोघे आई-वडील होणार आहेत, यासाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या होत्या.
आता हे जोडपे एका सुंदर परीचे आई- बाबा झाले आहेत. संपूर्ण खुराना कुटुंब छोट्याशा परीचे आगमन आणि एका छोट्याश्या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांचे नातेवाईक देखील त्यांना आणि त्यांच्या मुलीला शुभेच्छा देत आहेत.
अपारशक्तीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो त्याचा आगामी चित्रपट ‘हेलमेट’मुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. ‘हेलमेट’ या चित्रपटात त्या लोकांची कहाणी दाखवली जाणार आहे, जे लोक दुकानातून कंडोम खरेदी करताना लाजतात की, कॉन्डम खरेदी करताना त्यांना लोकांनी पाहिले, तर समाज त्यांच्याबाबत काय विचार करेल. या चित्रपटाची कहाणी खूप मजेशीर आणि सामाजिक संदेश देणारी असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण
-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’
-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा