Saturday, March 14, 2026
Home बॉलीवूड रीना दत्ताशी केले होते आमिर खानने पहिले लग्न; तर बोलणं झालं नाही म्हणून रडला होता अभिनेता

रीना दत्ताशी केले होते आमिर खानने पहिले लग्न; तर बोलणं झालं नाही म्हणून रडला होता अभिनेता

प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) उद्या म्हणजेच मंगळवारी (14मार्च)ला त्याचा 57वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत बरेच हिट चित्रपट दिले. आजही त्याचे चित्रपट आवडीने पाहिले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की, आमिर खानचे दोन वेळा लग्न झाले आहे. होय, त्याने वयाच्या 21व्या वर्षी रीना दत्ताशी पहिले लग्न केले होते. त्यावेळी रीना 19 वर्षांची होती. आमिर आणि रीना बरेच दिवस त्यांचे लग्न कुटूंबापासून लपवत होते. क्रिस्टीना डॅनियल यांच्या ‘आय विल डू इट माय वे: इनक्रेडिबल जर्नी ऑफ आमिर खान’ या पुस्तकात या प्रेमकथेबद्दल लिहिले गेले आहे.

बहिणीच्या धमकीनंतर आमिरच्या घरी गेली होती रीना
आमिर जेव्हा ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटाची शूटिंग करत होता, तेव्हा त्याने रीनाशी लग्न केले. पण त्याच्या एका वर्षापूर्वीच त्यांचे अफेअर सुरू झाले होते. तथापि, त्यावेळी आमिर 20 वर्षांचा होता आणि रीना 18 वर्षांची होती. कमी वय असल्यामुळे त्यांना लग्नासाठी थांबावे लागले. याखेरीज दोन कुटुंबात मतभेद असल्यामुळे त्यांचे लग्न होणे अशक्य वाटत होते. पण आमिर 21 वर्षांचा होताच तो रीनासमवेत कोर्टात पोहोचला आणि लग्नाची नोंद केल्यानंतर दोघे गुपचूप आपापल्या घरी गेले. बरेच दिवस त्यांनी हे लग्न कुटूंबापासून लपवून ठेवले. पण एक दिवस रीनाच्या बहीणीला संशय आला आणि तिने वडिलांना सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर रीना आमिरच्या घरी गेली आणि या जोडप्याने त्यांच्या पालकांना लग्नाविषयी सांगितले.

रीनाच्या आईवडिलांना लग्न स्वीकार करण्यास लागला होता वेळ
आमिर खानचे वडील ताहिर हुसेन यांनी त्यांच्या नात्याला सहजतेने अनुमती दिली. त्यांनी रीनाचे सून म्हणून स्वागतही केले. पण रीनाच्या वडिलांना हे नाते सहज मान्य नव्हते. मुलीच्या लग्नाची बातमी ऐकताच वडिल दत्ता चकित झाले आणि आजारी पडले. त्यांना ताबडतोब दवाखान्यात दाखल करावे लागले. यावेळी, आमिरने त्यांची खूप सेवा केली. त्यानंतर वडिल दत्ताचा आशीर्वाद त्यांना मिळाला.

जेव्हा रीनाशी बोलणे न झाल्यामुळे रडला होता आमिर
जूही चावलाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ‘कयामत से कयामत तक’ च्या शूटिंग दरम्यान आमिर दररोज रीनाला फोन करत असे. एकदा संपूर्ण युनिट शूटिंगसाठी ऊटीवरून बेंगलोरला जात होते, तेव्हा आमिर रीनाशी बोलू शकला नाही. गाडी निघायला तयार होती, पण डोळ्यांत अश्रू घेऊन आमिर म्हणाला, की तो रीनाशी बोलल्याशिवाय जाणार नाही.

जेव्हा ‘कयामत से कयामत तक’ रिलीज झाला, तेव्हा पदार्पण केलेला हा अभिनेता विवाहित होता असे कुणालाही माहित नव्हते. कारण हे माहित असण्याचा चित्रपटाच्या यशावर खूप मोठा फरक पडू शकला असता. हे लग्न जवळपास 16 वर्षे टिकले. मात्र 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या जोडप्याला दोन मुले (मुलगा जुनैद आणि मुलगी इरा) आहेत, जी आता रीनासोबत राहतात. तर आमिर खानने पुढे 2005साली किरण रावशी दुसरे लग्न केले. 2011 मध्ये सरोगसी द्वारे या जोडप्याने आझाद राव खान या मुलाला जन्म दिला.(april 2021 2021 aamir khan married reena dutta without telling the family they divorced in 16 years)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ज्याला गर्विष्ठ म्हणाला, त्याच ‘भाईजान’ने वाचवले आमिरचे प्राण; दीड वर्षे घेतलेलं स्वत:ला घरात कोंडून

अमिताभ बच्चन यांनी जेव्हा पहिल्यांदा केला होता आमिर खानला फोन; उत्तर देताना म्हणायचा फक्त ‘हे’ दोन शब्द

हे देखील वाचा