बॉलिवूडमध्ये डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांचा चित्रपट प्रवास खूपच रोचक आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती हे बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांपैकी एक आहेत. ज्यांनी कोणत्याही चित्रपट पार्श्वभूमीशिवाय इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटविला. जर त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर मिथुन दा यांनी या मार्गावरही बरीच रंजक वळणं पाहिली आहेत. नुकतेच मिथुन चक्रवर्ती भारतीय जनता पक्षात दाखल झाले. परंतु, फार कमी लोकांना माहिती आहे की मिथुन चक्रवर्ती हे त्यांच्या विद्यार्थी जीवनात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिन) चे सदस्य राहिले आहेत.
पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मिथुन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते. 60च्या दशकात नक्षलवादी आंदोलनमध्ये ते सक्रिय होते. त्यांना अर्बन नक्सल म्हटले जायचे. मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कोलकाता येथे झाला. गौरंग चक्रवर्ती असे त्यांचे खरे नाव आहे. मात्र हे नाव त्यांनी कधी चित्रपटात वापरले नाही.
मिथुन चक्रवर्ती चित्रपटांकडे वळण्यापूर्वी नक्षलवादी नेते होते. त्यांचा एकुलता एक भाऊ करंट लागून मरण पावला. या दुःखद घटनेमुळे त्यांना तो मार्ग सोडून कुटुंबाकडे परत यावे लागले. मिथुन दा जेव्हा नक्षलवाद्यांसमवेत होते तेव्हा ते तत्कालीन नक्षलवादी नेता रवी राजन यांचे खास मित्र बनले होते. ज्यांना त्यांचे मित्र ‘भा’ म्हणत असत. म्हणजेच सर्वात मोठा संरक्षक.
सन 1976 साली मिथुन दा यांनी दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या ‘मृगाया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील मिथुन दा यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘मुक्ति’ होता. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले आणि लवकरच हिंदी चित्रपट जगतात चांगले स्थान मिळवले. 1982 साली ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट त्यांना देशातील प्रत्येक घरात घेऊन गेला.
याव्यतिरिक्त डाव्या विचारधारेकडे मिथुन दा यांचा खूप कल होता. 2014 साली ते सध्या बंगाल राज्यात सत्ता असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे सदस्य झाले होते. टीएमसीने त्यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून संसदेत पाठवले. जेथे ते एप्रिल 2014 ते डिसेंबर 2016 पर्यंत राहिले. परंतु यानंतर त्यांनी पक्षाच्या व राज्यसभेच्या खासदार पदाचा राजीनामा दिला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साठच्या दशकातील ‘चॉकलेट हिरो’, ज्याचे संपूर्ण कुटुंब होते चित्रपट उद्योगात
-तबला वादनासोबतच चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उस्ताद ‘झाकीर हुसेन’