धक्कादायक! ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेचा हैराण करणारा खुलासा, रोलसाठी निर्मात्याने ठेवली होती ‘ही’ अट

‘पवित्र रिश्ता’ सारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. जसे जवळपास प्रत्येक कलाकाराला अभिनय क्षेत्रात येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच काहीसे अंकिताबाबतही घडले आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले, जे वाचून प्रत्येकजण हैराण झाल्याशिवाय राहणार नाही.

मुलाखतीदरम्यान अंकिताने खुलासा केला की, एका भूमिकेसाठी चित्रपट निर्मात्याने तिला त्याच्यासोबत झोपण्यास सांगितले होते. ती म्हणाली, “मला वाटते की, मी खूप शक्तीशाली आहे. मी कोणालाही अशाप्रकारे स्वत:कडे पाहूदेखील देत नाही. परंतु होय मी माझ्या आयुष्यात या गोष्टीचा एक ते दोन वेळा सामना केला आहे.”

पुढे बोलताना अंकिता म्हणते, “सुरुवातील जेव्हा मी लहान होते, तेव्हा मला दाक्षिणात्य चित्रपटासाठी बोलावले होते. तिथे एका व्यक्तीने मला खोलीत बोलावले आणि म्हटले की, ‘अंकिता मला तुला काही विचारायचे आहे.’ मी विचारल्यानंतर त्यांनी म्हटले की, ‘तुला तडजोड करावी लागेल.'”

“मी त्यावेळी १९ ते २० वर्षांची होते. त्यांनी ज्या खोलीत मला बोलावले होते, तिथे कुणीच नव्हते. मी एकटीच होते. हे पाहून मी हुशारीने विचारले की, चला सांगा कोणत्या प्रकारची तडजोड करावी लागेल? मला डिनर पार्टीसाठी जावे लागेल का? चित्रपटाच्या निर्मात्यांना काय हवं आहे?” असे अंकिता पुढे बोलताना म्हणाली.

“मी इतका विचारच केला नव्हता. परंतु जेव्हा त्यांनी म्हटले की, मला निर्मात्यासोबत झोपावे लागेल, तेव्हा मी त्याला चांगलाच धडा शिकवला होता. मी त्याला म्हणाले होते, ‘तुमच्या निर्मात्यांना झोपण्यासाठी मुलगी हवीय, एक प्रतिभावान अभिनेत्री नाही,'” असे सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचे सांगत अंकिताने म्हटले.

“त्यानंतर मी जशी तिथून निघत होते, तेव्हाच त्यांनी माझी माफी मागितली आणि म्हटले की, मी तुम्हाला माझ्या चित्रपटात घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. त्यानंतर मी नकार दिला आणि म्हटले की, आता तुम्हाला वाटले तरीही मी या चित्रपटात काम करणार नाही,” असे अंकिताने पुढे म्हटले.

अंकिताने पुढे आणखी खुलासे केले. तिने म्हटले की, “जेव्हा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये नाव कमावल्यानंतर चित्रपटांमध्ये आले, तेव्हा पुन्हा एकदा मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. त्यावेळी माझा सामना एका मोठ्या अभिनेत्याशी झाला. ज्यावेळी मी त्याला भेटले आणि हात मिळवला, तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटले होते. त्यावेळी मी माझा हात मागे घेतला होता.”

ती पुढे म्हणाली की, “मला कोणत्याही अभिनेत्याचे नाव घ्यायचे नाही. परंतु त्याने हात पकडताच मला खूप विचित्र वाटले. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण त्या अभिनेत्याला ओळखतो. मला जेव्हा त्या अभिनेत्याकडून वाईट पद्धतीने हात मिळवला, तेव्हाच मला समजले की, आता माझे इथे काही होणार नाही.”

अंकिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. ही मालिका सन २००९ पासून ते सन २०१४ पर्यंत चालली होती. या मालिकेत अंकिताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती.

याव्यतिरिक्त मोठ्या पडद्यावरील अंकिताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘पंगा क्वीन’ कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती ‘बागी ३’ मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

-कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल