भारतातली एखादी व्यक्ती जेव्हा प्रसिद्ध अभिनेता अथवा अभिनेत्री बनवण्याचं स्वप्न पाहतात, तेव्हा त्यांच्यासाठी हे स्वप्न पूर्ण करण्याची एकमेव जागा असते, ती म्हणजे स्वप्नांची नगरी मुंबई. प्रसिद्ध आणि व्यासंगी कलाकार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून हे सर्वजण मुंबईला येत असतात. काही जण तर अगदी घरच्यांच्या विरोधात जाऊन स्वप्नपूर्तीसाठी मुंबई गाठतात.
मुंबई ही जरी चंदेरी दुनियेत जगणाऱ्यांसाठी स्वप्नांची नगरी असली, तरीही तिथे स्वतःला टीकवून ठेवणे मात्र अतिशयय कठीण असते. त्यामुळे असे अनेक कलावंत सिनेजगतात होऊन गेले आहेत, जे प्रसिद्ध तर झाले परंतू पुढे जाऊन या दुनियेत स्थिरावले नाही. आणि अपोआपच मुख्य प्रवाहातून दूर गले.
आज आपण अशाच अभिनेत्रीबाबत जाणून घेणार आहोत, जीने सुपरस्टार सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत काम केले. मात्र, पुढे जाऊन ही अभिनेत्री चित्रपट सृष्टीतून जणू गायबच झाली.
चांदणी ही अभिनेत्री एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर होती. बॉलिवूडमधील आघाडीच्या हिरोसोबत काम केल्याने ती अगदी चाहत्यांच्या मनावर राज्य करु लागली होती.
‘सनम बेवफा’ या चित्रपटात चांदनीने सलमान खानसोबत मुख्य भूमिका केली होती. तिने जवळपास 10 चित्रपटांमध्ये काम केले. परंतू, यातील एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास यश मिळवू शकला नाही. याच असफलमुळे तिने चित्रपट सोडून देण्याचा विचार केला आणि ती परदेशात स्थायिक झाली.
पुढे आर्थिक स्थिरतेसाठी तिने डान्स शिकवणे चालू केले. त्यानंतर याच कामातून तीला पैसे मिळू लागले.
अभिनेत्री चांदणी हीला दोन मुली आहेत. त्यांची नावे तिने बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या नावावरून ठेवली आहेत. एकीचे नाव करीना तर दुसरीचे नाव करिश्मा असे आहे.