Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड बंधूप्रेम! कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संगीतकार भावाने आपले आडनावच केलंय भावाचे नाव

बंधूप्रेम! कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संगीतकार भावाने आपले आडनावच केलंय भावाचे नाव

बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार असं म्हटलं की, सगळ्यांच्या तोंडात एकच नाव येतं ते म्हणजे साजिद – वाजिद. या जोडीने प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळवले. पण नियतीला कदाचित मान्य नसेल, म्हणून त्यातील एका नावाला लांब करण्याचा पर्यंत केला. पण ते नाव लांब होऊनही प्रत्येकाच्या मनात अमर राहणार‌ आहे. साजिद खान हा आपला भाऊ वाजिद याच्या मृत्यूनंतर खूपच दुःखात होता. प्रत्येक दिवशी त्याला त्याच्या भावाची आठवण येते. नुकताच एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत साजिदने त्याच्या भावाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. वाजिदच्या निधनानंतर सलमानने कसा त्याला सपोर्ट केला, हे देखील त्याने सांगितले आहे.

संगीतकार साजिद आणि वाजिद या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत.परंतु साजिद- वाजिद या नावाला नेहमी एकच ओळख मिळाली आहे. मागच्या वर्षी किडनीचा आजार आणि कोव्हिड 19 मुळे वाजिद खानचा मृत्यू झाला. एका मुलाखतीत साजिदने वाजिदच्या नावाला त्याच्यासोबत जोडलेलं ठेवून त्याला प्रेक्षकांमध्ये जिवंत ठेवण्याच्या मागचे कारण सांगितले आहे.

साजिद खानने सांगितले की, “मला नाही वाटत की सगळ्यांनी मला साजिद खान या नावाने ओळखावे, त्यामुळे मी वाजिद या नावाला स्वत:च आडनाव मानलं आहे. त्यामुळे माझं नाव साजिद वाजिद असं आहे. शेवटपर्यंत ते असंच राहणार आहे. वाजिद आता शरीराने आपल्यामध्ये उपस्थित नाहीये. तरीही त्याची उपस्थिती मी नेहमीच फील करतो.”

कामाच्याबाबत बोलताना साजिदने सांगितले की, “मी माझ्या संगीताची रचना सुरू केली होती, पण याबाबत आधी कधी विचार केला नव्हता. मला असं वाटतं की, हे सगळ फक्त वाजिदमुळे शक्य झालं आहे.”

साजिदने हे ही सांगितले की, त्याचे त्याच्या भावासोबत बाँडिंग कसं होतं. वाजिदच्या शेवटच्या दिवसांची आठवण काढत साजिद असे म्हणतो की, “मी त्याच्या एवढ्या जवळ होतो की, सगळ्यांचा विरोध पत्करून तो आजारी असताना मी पीपीई किट घालून त्याला आयसीयूमध्ये भेटायला जायचो. माझ्या आयुष्यातील त्याची जागा इतर कोणीच भरून काढू शकत नाही. तो जेव्हा या जगातून निघून गेला, तेव्हा मी सलमान भाईला म्हणालो होतो की, मला वाटत नाही आता माझ्यात आता ती संगीताची आग राहिली असेल. माझं काम आता इथेच थांबलं आहे. पण त्याने मला प्रत्येक प्रसंगातून बाहेर काढले. त्या काळात तो माझा खूप मोठा आधार झाला. आज माझ्यात जो आत्मविश्वास आहे, जी आग आहे ती फक्त सलमान भाईमुळेच आहे.”

वाजिद खानचं निधन 1 जून 2020 रोजी झालं. या दिवसात साजिद एका रियॅलिटी टीव्ही सिंगिंग शोला जज करत होता. त्यावेळी ही बातमी कानावर येताच त्याला खूप मोठा धक्का बसला होता. साजिद- वाजिद या सुपरहिट जोडीने ‘दबंग’, ‘हिरोपंती’, ‘एक था टायगर’, ‘पार्टनर’, ‘मुझसे शादी करोगी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांना संगीत दिले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

-बनायचे होते अभिनेता, पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत गायकाने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा

-सुपरस्टार राजेश खन्ना यांनी बिग बींचा अपमान केल्यानंतर, जया बच्चन यांनी दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

हे देखील वाचा