Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘या’ कारणामुळे आलियाला नकोय वडील महेश भट्ट यांच्या सारखा नवरा! वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

‘या’ कारणामुळे आलियाला नकोय वडील महेश भट्ट यांच्या सारखा नवरा! वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी कमी काळात आपल्या अभिनयाच्या जादूने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या चित्रपटाचे नाव जरी घेतले, तरीही प्रेक्षकांच्या ओठांवर त्या- त्या अभिनेत्रीचं नाव आपसुक येऊन जातं. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी ‘आलिया भट्ट.’ तिने नुकताच आपला २८ वा वाढदिवस साजरा केला. तिचा जन्म १५ मार्च, १९९३ रोजी मुंबईत झाला होता. आलियाचे वडील हे एक मोठे दिग्दर्शक आहेत. त्यांचं नाव महेश भट्ट आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आपण जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…

चित्रपटात काम करण्यासाठी 3 आठवड्यात कमी केले वजन
‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटासाठी आलियाने तीन आठवड्यांत जवळपास 16 किलो वजन कमी केले होते. त्यावेळी तिचे वजन 67 किलोच्या आसपास होते. आलियाबरोबर सुमारे 400 मुलींनी या चित्रपटासाठी ऑडिशन दिले. यात तिची निवड झाल्यानंतर, करण जोहर तिला स्पष्टपणे म्हणाला होता की, “वजन कमी कर नाहीतर हा चित्रपट विसरून जा.”

आलियाच्या जीवनातील रोचक तथ्ये
– ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा आलियाचा पहिला चित्रपट नव्हता. सन 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संघर्ष’ या चित्रपटात, तिने प्रीती झिंटाच्या बालपणाचे पात्र साकारले होते. त्यावेळी ती फक्त 6 वर्षांची होती.
– आलियाने तिचे प्राथमिक शिक्षण जमनाबाई नर्सरी स्कूल (मुंबई) मधून केले. आलिया ही शाळेत एक ऍवरेज विद्यार्थीनी होती. परंतु इतर उपक्रमात ती नेहमी पुढे असे. मग ते डान्सिंग असो वा सिंगिंग.
– आलिया मसाबा गुप्ताची जवळची मैत्रिण असून तिच्या गर्लगँगचे नाव ‘स्पाईस गर्ल’ आहे. आलियाला पार्टी करणे आणि मैत्रिणींसह बाहेर जाणे आवडते.
– चित्रपटांव्यतिरिक्त आलिया ‘पेटा’शीही संबंधित असते. कारण तिला प्राण्यांची खूप आवड आहे.
– अभिनयाबरोबरच गाण्यातही भाग्य आजमावलेल्या आलियाला, संगीत दिग्दर्शक ए.आर. रेहमान यांनी वर्ल्ड फेमस म्युझिक स्कूलमध्ये प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली होती.
– अभिनेता इमरान हाश्मी आणि दिग्दर्शक मोहित सूरी हे तिचे चुलत भाऊ आहेत.
– आलियाची आई अर्धी काश्मिरी, तर अर्धी जर्मन आहे. तिचे वडील महेश भट्ट हे गुजरातचे रहिवासी आहेत. तसेच, पूजा भट्ट आणि राहुल भट्ट हे तिचे सावत्र भावंडे आहेत.
आलिया तिच्या आईच्या खूप जवळ आहे. मात्र, बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात झाल्यावर ती वडिलांच्या जवळ आली. इतर मुलींप्रमाणेच आलियाला तिच्या वडिलांसारखा नवरा नको आहे. याचे कारण असे, की तिच्या वडिलांचे आयुष्य बर्‍यापैकी वादविवादात राहिले आहे आणि त्यांचे बरेच अफेअरही होते. आलिया म्हणाली की, तिला असा पती हवा आहे, जो तिचा मित्र बनून तिला नेहमी आनंदी ठेवू शकेल.
– आलियाच्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे तिची आई सोनी रझदान, बहीण शाहीन आणि मार्गदर्शक करण जोहर.
– तिला गायकीव्यतिरिक्त चित्रकला देखील खूप आवडते. तिला चारकोल पेंटिंगची आवड आहे.
– आलिया चांगल्या झोपेला तिच्या सौंदर्याचे रहस्य मानते. ती एक ‘मॉर्निंग पर्सन’ आहे आणि ती सकाळी लवकर उठते.
– आलियाला फ्रेंच फ्राईज खूप आवडतात आणि ती दिवसा कोणत्याही वेळी ते खात असते.
– आलियाला ग्रीन टी सोबत शेंगदाणे खायला आवडते. मूग डाळीचा हलवा तिचा आवडता पदार्थ आहे.
– ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या शूटिंगचा पहिला दिवस हा आलियाच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस होता.
– आलियाचे भारतातील आवडते ठिकाण हिमाचल प्रदेश आहे.
– आलिया लव कम अरेंज मॅरिज करू इच्छिते.
– आलियाचा यशस्वी मंत्र म्हणजे ‘काम, काम आणि काम.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बड्डे गर्ल आलियाने ९ वर्षांच्या करियरमध्ये कमावलीय तब्बल ‘एवढ्या’ कोटींची प्रॉपर्टी

-दारुचे व्यसन, स्पोर्ट्स कार आणि पाहिलेले मोठे अपयश, जाणून घ्या हनी सिंगचा बॉलीवूडमधील प्रवास त्याच्या खऱ्या नावासह

हे देखील वाचा