दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. सोशल मीडियापासून ते वास्तविक जीवनात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. इतकेच नव्हे तर अल्लूने गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या सेलेब्सच्या यादीत स्थान मिळवले आहे.
आपल्या अभिनय आणि स्टाईलच्या आधारे लोकांची मने जिंकण्याची जादू अल्लू अर्जुनमध्ये आहे. पण त्याचे हृदय तो कोणा दुसऱ्यालाच देऊन बसलाय. ती व्यक्ती आहे त्याची पत्नी स्नेहा रेड्डी. होय, अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डीचा प्रेम विवाह झाला होता. या दोघांची लव्हस्टोरी चित्रपटातील लव्हस्टोरीपेक्षा काही कमी नाही. आज आपण या जोडप्याच्या सुंदर लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊयात.
अल्लू त्याच्या मित्राच्या लग्नात स्नेहाला प्रथमच भेटला होता आणि पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. अल्लूने स्नेहाकडे पाहताच स्नेहाही हसली. मग काय? झाली यांची लव्हस्टोरी सुरू! अल्लू आणि स्नेहाने त्या लग्नातच एकमेकांना नंबर दिले आणि त्यानंतर त्यांचे बोलणे सुरू झाले.
स्नेहा हैदराबादमधील व्यावसायिकाची मुलगी होती. ती त्यावेळी मास्टर पदवी घेऊन अमेरिकेतून परत आली होती. तरीही अल्लू अर्जुनचे नाव तिला माहित होते. कारण त्यावेळी तेलुगु चित्रपटसृष्टीत अल्लूने आपली ओळख निर्माण केली होती.
अल्लूने खूप समजवल्यानंतर, त्याच्या वडिलांनी स्नेहाच्या वडिलांसमोर त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. पण स्नेहाच्या कुटुंबियांनी मात्र हा प्रस्ताव नाकारला. तरीही, अल्लू आणि स्नेहा दोघेही एकमेकांना सोडण्यास तयार नव्हते. दोघांनीही बर्याच प्रयत्नांनंतर आपापल्या कुटुंबातील सदस्यांची समजूत काढली आणि मग लग्न केले.
या जोडप्याला अयान आणि अरहा अशी दोन मुलंही आहेत. या अभिनेत्याचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता. त्याचे वडील अल्लू अरविंद हे तेलुगु चित्रपट दिग्दर्शक आहेत आणि तो प्रसिद्ध तेलुगु अभिनेता चिरंजीवी यांचा पुतण्या आहे.
सन 2003 मध्ये, अल्लू अर्जुनने लालकृष्ण राघवेंद्र राव यांच्या ‘गंगोत्री’ या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. अल्लूने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. मजेची गोष्ट म्हणजे, त्याचे चित्रपट येताच चित्रपटगृहे हाऊसफुल होतात. अल्लूने त्याच्या बर्याच चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा फिल्मफेअर आणि नंदी पुरस्कार जिंकला आहे.
अल्लू अर्जुन खूप विलासी जीवन जगतो. त्याला वाहनांचा खूप छंद आहे. अल्लूचा आलिशान बंगला जवळपास 100 कोटींचा आहे. या व्यतिरिक्त त्याच्याकडे बीएमडब्ल्यू, जॅग्वार, ऑडी, रेंज रोव्हर सारख्या लक्झरी कारचा संग्रह आहे. 2016 मध्ये, अल्लू हा गुगलवर सर्वाधिक शोधला जाणारा टॉलिवूड स्टार होता.
अभिनेता अल्लू अर्जुनने नुकतेच, पत्नी स्नेहासोबत लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करून त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा क्यूटी. हा दहा वर्षांचा प्रवास खूपच रमणीय होता आणि अजून बरीच वर्षे यायची बाकी आहेत.’
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विरुष्काच्या पहिल्या भेटीचा ‘तो’ किस्सा होता विराटला अस्वस्थ करणारा; वाचा काय घडले होते त्यावेळी?
-संगीतकाराने भावाच्या नावालाच बनवले आपले आडनाव, म्हणाला ‘माझं नाव साजिद वाजिद असं आहे आणि…’