Tuesday, July 9, 2024

बॉबी देओल बनला अंपायर! मीम्स शेअर करत नेटकऱ्यांनी उडवली डान्सची थट्टा

बॉलिवूड कलाकार आणि सोशल मीडियावरचे मीम्स यांचे नाते काही नवीन नाही. जेव्हा जेव्हा एखादा चित्रपट किंवा वेब सीरिज रिलीझ होते, तेव्हा इंटरनेटवर त्याच्याशी संबंधित मजेदार मीम्सचा पाऊस पडतो. जेव्हा एखादा कलाकार सोशल मीडियावर बनविल्या जाणाऱ्या मीम्सवर प्रतिक्रिया दाखवून आपली नाराजी व्यक्त करतो, तेव्हाही सगळे त्याला गमतीशीर म्हणून घेतात. असेच आता सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचे मीम्स व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात तो एका वेगळ्या पद्धतीने नाचताना दिसत आहेत.

तुम्हाला माहित आहे का की, बॉबी देओल अभिनेत्याशिवाय क्रिकेट पंचही आहे? आश्चर्यचकित नका होऊ, हे आम्ही बोलत नाही, तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मीम्स म्हणत आहेत. वास्तविक, बॉबी देओलची डान्स करण्याची स्वत:ची एक वेगळी पद्धत आहे. अभिनेत्याचा हा डान्स त्याच्या चाहत्यांना खूप मजेदार वाटतो.

असे अनेक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत, ज्यात कलाकार क्रिकेट पंचाप्रमाणे हवेत हात उंचावत आऊटच्या पोजमध्ये नाचत आहेत. बॉबीची ही स्टाईल पाहून असे लक्षात येते, की ही त्याची ‘सिग्नेचर स्टेप’ आहे. कारण तो ही स्टेप प्रत्येक डान्समध्ये करत असतो. यामुळे त्याची खूप थट्टाही केली जात आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर बॉबी देओलने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये 25 वर्षे पूर्ण केली आहेत. 2018 मध्ये, ‘रेस 3’ चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. यापूर्वी त्याला चांगले चित्रपट मिळत नव्हते, परंतु या चित्रपटानंतर त्याला चांगल्या ऑफर येऊ लागल्या. सन 2020 मध्ये त्याने ‘आश्रम’ या वेब सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण केले. या वेब सीरिजमधील अभिनयासाठी त्याला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संगीतकाराने भावाच्या नावालाच बनवले आपले आडनाव, म्हणाला ‘माझं नाव साजिद वाजिद असं आहे आणि…’

-‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

-बनायचे होते अभिनेता, पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत गायकाने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा

हे देखील वाचा