Sunday, August 10, 2025
Home बॉलीवूड अभिनयाचे बादशाह! बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला होता सरकारी नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश

अभिनयाचे बादशाह! बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला होता सरकारी नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश

अनेकजण चित्रपटसृष्टीत येऊन आपलं नाव चमकवण्याचा प्रयत्न करत असतात. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर ते खूप मेहनत करतात. काहींना त्यात यश मिळते, तर काहीजण मात्र हताश होऊन परत आपल्या गावी परततात. चित्रपटसृष्टीमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी केवळ नाव कमावले नाही तर, अभिनयासाठी सरकारी नोकरी धुडकावून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आता आपण अशा काही बॉलिवूड अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांची सरकारी नोकरी आणि ऐष आरामाचे आयुष्य सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

देव आनंद
आपल्या अभिनयाने आणि अंदाजाने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते म्हणजे देव आनंद. ते देखील एकेकाळी सरकारी नोकरी करत होते. परंतु अभिनयाची आवड असल्याने ते मुंबई आले. ते जेव्हा मुंबईला आले होते, तेव्हा त्यांच्याकडे केवळ 30 रुपये होते. त्यामुळे काम मिळेपर्यंत त्यांना दुसरीकडे काम करावं लागलं. काम करत करत त्यांना मिलिटरी सेन्सर ऑफिसमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली होती. तिथे त्यांना सैनिकांनी पाठवेल्या‌ चिट्ट्या त्यांच्या आई- वडिलांना वाचून दाखवायचे काम होते.

राज कुमार
‘हम आखों का सुरमा नहीं चुराते, हम आंख ही चुराते है.’ हा डायलॉग समोर आला की, आठवण येते ती म्हणजे राज कुमार यांची. आपल्या दमदार अभिनयाने आणि आवाजाने त्यांनी सगळ्यांच्या मनावर राज्य केले आहे. राज कुमार जेव्हा पहिल्यांदा मुंबईमध्ये, आले होते तेव्हा त्यांना पोलीस उपनिरीक्षकची नोकरी मिळाली होती. पण 1952 मध्ये त्यांनी पोलिसाची नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

शिवाजी सातम
‘कुछ तो गडबड हैं’ हा डायलॉग तर तुम्हाला आठवतच असेल. टीव्हीवरील सीआयडी या मालिकेतून आपले वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे शिवाजी सातम. हे आधी एका सरकारी बँकमध्ये रोखपाल (कॅशिअर) होते. पण 1987 मध्ये त्यांनी ‘रिश्ते- नाते’ या टीव्ही मालिकेेतून अभिनयात प्रवेश केला. आणि ती सरकारी नोकरी सोडून दिली. पुढे ते चित्रपटांमध्ये काम करू लागले आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

अमरीश पुरी
बॉलिवूडमधील ‘मोगॅंबो’ या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे अमरीश पुरी होय. त्यांनी जरी चित्रपटात खलनायकाची भूमिका निभावली असली, तरीही प्रेक्षकांच्या मनात त्यांनी त्यांचं एक वेगळच स्थान निर्माण केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्याआधी ते विमा‌निगम येथे सरकारी क्लार्कची नोकरी करत होते. जवळपास 21 वर्ष त्यांनी सरकारी नोकरी केली. त्यानंतर त्यांना चित्रपटात येण्याची संधी मिळाली. 1971 मध्ये त्यांनी ‘रेशम ओर शेरा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या सहाव्या वर्षी गायनाची सुरुवात करणाऱ्या ‘अलका याज्ञिक’, चक्क ओसामा बिन लादेनही बनला होता त्यांचा फॅन

-रामायणापासून ते महाभारतापर्यंत ‘या’ कलाकारांनी केला आहे राजकारणात प्रवेश; जाणून घ्या त्यांच्याबद्दल

-‘या’ कारणामुळे बनावे लागले अभिनेत्री; वयाच्या सोळाव्या वर्षीच बांधली होती लग्नगाठ, वाचा ७ फिल्मफेअर अवॉर्ड जिंकणाऱ्या अभिनेत्रीबद्दल

हे देखील वाचा