बिनधास्त, बेधडक अंदाजात रुपेरी पडद्यावर दिसणारी रिया ही खऱ्या आयुष्यात देखील तितकीच बिनधास्त आणि बोल्ड आहे. सुचित्रा सेनची नात मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया फाल्गुनी पाठकच्या ‘याद पिया की आने लगी’ ह्या व्हिडीओमुळे प्रसिद्धीझोतात आली होती. तिच्या करियरच्या सुरवातीलाच तिच्याकडे सेक्सी अभिनेत्री म्हणून पाहिलं गेलं आणि त्या प्रकारच्या मालिका तिला मिळत गेल्या.
अभिनेत्री रिया सेन बऱ्याच काळापासून मुख्य प्रवाहापासून दूर असली तरी चाहत्यांचे लक्ष कसे वेधून घ्यायचं हे तिला चांगलेच माहीत आहे. सन २००१ मध्ये ‘स्टाईल’ या चित्रपटातून तीने आपल्या सिनेकरियरची सुरवात केली. त्यानंतर ‘अपना सपना मनी मनी’ या चित्रपटात तिची भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली. हिंदी सोबतच तिने बंगाली, तामिळ आणि मल्याळम भाषांतील चित्रपटात देखील काम केले आहे. काही मोजक्या सिनेमांचा अपवाद वगळता बॉलिवूडमध्ये तिला फारसे असे यश मिळाले नाही. रिया कधी एमएमएसमुळे चर्चेत राहिली तर कधी तिच्या प्रेमप्रकारणांमुळे.
रिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेयर करत असते. ती आपल्या हेल्थकडे विशेषकरुन लक्ष देते. तिने अनेक बिकनीशूट केले आहे. आपल्या प्रत्येक फोटोमध्ये ती नेहमीच आकर्षक दिसत असते. वयाच्या चाळीशीच्या आसपास पोहचून सुद्धा ती अद्यापही फिट आहे. नुकताच तीने आपला एक बिकनीवरील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात तिचा ग्लॅमरस अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस पाडला आहे. तिच्या या फोटोला खूप जणांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सध्या ती गोव्यात सुट्टीची मज्जा घेत आहे आणि हा फोटो देखील तिकडेच शूट केला गेला आहे, ज्यात तिने काळ्या कलरची बिकनी परिधान केली आहे. तिच्या हा बोल्डनेसबद्दल जाणून घ्यायला चाहते देखील तिला प्रश्न विचारत आहेत.
सन २००५ मध्ये ती अश्मित पटेलबरोबर वासू भगनानीच्या सिलसिले या चित्रपटात काम करत होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्या दोघांचा अफेयरला सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु त्याच वेळी रिलेशनशिपमध्ये असताना त्या दोघांचा ९० सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात हे दोघे एकमेकांसोबत अश्लील चाळे करत होते. परंतु काही वेळाने तो व्हिडिओ खोटा असल्याचे सांगत त्यांनी त्यावर पडदा टाकला. काही काळ ती क्रिकेटपटू युवराज सिंगला सुद्धा डेट करत होती, पण हे नातं जास्त काळ टिकल नाही.
तीने सन २०१७ मध्ये शिवम तिवारी या फोटोग्राफर सोबत लग्न करून बॉलिवूडला कायमचा राम राम ठोकला होता. जरी ती चित्रपटात काम करत नसली तरी तिने नुकतेच ‘पॉयजन’ या वेब सिरीजमध्ये काम केले आहे. सोबतच तिचे झंकार बिट्स, स्टाईल, शादी नंबर १, लव्ह यु हमेशा अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.
शीना बोहरा या बहुचर्चित हत्याकांडावर बनलेल्या ‘ डार्क चॉकलेट’ या सिनेमात रियाने शीना बोराची भूमिका साकारली होती. तसेच एका शॉर्टफिल्ममध्ये लेस्बियनची भूमिका सरकताना तिला प्रेक्षकांनी पाहिले आहे. तर काही महिन्यांपूर्वी रियाने एक रेस्टॉरंटच्या वेटरकडे सेक्सची मागणी केल्याचे वृत्त आले होते. या प्रकरणामुळे ती बरीच चर्चेत आली होती.