Saturday, June 29, 2024

बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी केला आपल्यापेक्षा अधिक वय असलेल्या कलाकारांसोबत रोमान्स, ‘धक-धक’ गर्लचाही समावेश

चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींचे वय खूपच कमी असल्याचे दिसते. 70 ते 80 च्या दशकात त्या काळातील अभिनेत्रींसोबत काम केलेले अभिनेते आजही पडद्यावर दिसतात. परंतु त्या काळातील अभिनेत्री मात्र आता लाईमलाईटपासून केव्हाच लांब झाल्या आहेत. तेच अभिनेते आता स्वत:पेक्षा लहान असणाऱ्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसत आहेत. आता आपण बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री बघणार आहोत, ज्यांनी त्यांच्या वडिलांच्या वयासमान अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

आलिया भट्ट- शाहरुख खान
आलिया आणि शाहरुख खानने ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. यामध्ये आलिया एक थेरेपिस्ट असते. या चित्रपटात जास्त रोमान्स नाही दाखवला. परंतु शेवटी या गोष्टीचा खुलासा होतो की, तिला शाहरुख खान खूप आवडत होता.

यावेळी आलिया आणि शाहरुखच्या वयात 28 वर्षाचे अंतर होते.

सोनाक्षी सिन्हा- सलमान खान
‘दबंग’ या चित्रपटातून सोनाक्षी सिन्हाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यावेळी ती 23 वर्षाची होती. तिने 45 वय असणाऱ्या सलमान खानसोबत रोमान्स केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूपच प्रेम मिळाले होते.

जिया खान- अमिताभ बच्चन
बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आज या जगात नाही. ‘निःशब्द’ या चित्रपटातून ती खूप प्रसिद्ध झाली होती. तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमान्स केला होता.

त्यावेळी ती केवळ 19 वर्षांची होती, तर अमिताभ बच्चन हे 64 वर्षाचे होते.

विद्या बालन- नसिरुद्दीन शाह
आपल्या दमदार अभिनयाने सर्वत्र आपले नावं कमावणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. तिच्या ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘बेगम जान’ या चित्रपटात तिने नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत रोमान्स केला आहे.

त्यावेळी ते विद्या बालनपेक्षा 39 वर्षांनी मोठे होते.

माधुरी दीक्षित – विनोद खन्ना
माधुरी दीक्षितने ‘दयावान’ या चित्रपटात विनोद खन्ना यांच्यासोबत काही बोल्ड सीन दिले होते.

त्यावेळी विनोद खन्ना तिचा पेक्षा 29 वर्षांनी मोठे होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयाचे बादशाह! बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज कलाकारांनी केला होता सरकारी नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश

-वयाच्या सहाव्या वर्षी गायनाची सुरुवात करणाऱ्या ‘अलका याज्ञिक’, चक्क ओसामा बिन लादेनही बनला होता त्यांचा फॅन

-रामायणापासून ते महाभारतापर्यंत ‘या’ कलाकारांनी केला आहे राजकारणात प्रवेश; जाणून घ्या त्यांच्याबद्दल

हे देखील वाचा