Tuesday, July 9, 2024

जातीव्यवस्थेला न जुमानता ‘या’ खान मंडळींनी बांधली हिंदू मुलीशी लग्नगाठ; ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’चाही समावेश

हिंदी चित्रपटसृष्टी जितकी आपल्या चित्रपट आणि चकाकणाऱ्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे, तितकीच ती खुल्या विचारांबद्दल आणि जाती-धर्मांना फारसे महत्त्व न दिल्यामुळे देखील ओळखली जाते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जातीचा फारसा विचार केला जात नाही. हेच कारण आहे की, इथे प्रत्येक धर्माचे लोक पाहायला मिळतात. इतकेच नाही तर बरेच सेलेब्रिटी असेही आहेत, ज्यांनी भिन्न धर्माशी संबंधित असलेल्या व्यक्तीला आपला जीवनसाथी बनविले आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा काही खान कलाकारांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी हिंदू महिलांशी विवाह केला आणि ते जोडपे आनंदी संसारही करत आहेत. चला तर मग सुरुवात करुया…

शाहरुख खान- गौरी
शाहरुख खान आणि गौरीची प्रेमकथा सर्वांनाच माहित आहे. शाहरुख खानने गौरीला मिळवण्यासाठी कशाप्रकारे बरीच धडपड केली हेही सर्वांना ठाऊक आहे. इतकेच नाही, तर गौरीच्या आई-वडिलांची लग्नासाठी परवानगी मिळावी, यासाठी शाहरुखने त्यांना जवळपास 5 वर्षे हिंदू असल्याचे भासवले होते. शाहरुख त्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला. 26 ऑगस्ट 1991 रोजी शाहरुख आणि गौरीचे लग्न झाले. यादरम्यान गौरीचे नाव आयशा ठेवले गेले. तसेच, 25 ऑक्टोबर 1991 रोजी हिंदू पद्धतीनेही या जोडप्याचे लग्न झाले.

आमिर खान- किरण राव
‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमिर खानचादेखील या यादीमध्ये समावेश आहे. आमिर खानने एक नव्हे, तर दोन हिंदू महिलांशी लग्न केले आहे. त्याची पहिली पत्नी रीना दत्ता होती. लग्नाच्या 16 वर्षांनंतर 2002 मध्ये आमिरने रीनाशी घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या 3 वर्षानंतर आमिरने किरण रावशी लग्न केले.

अरबाज खान- मलायका अरोरा
सलमान खानच्या कुटुंबामध्ये अनेक धर्मांचे लोक दिसतात. त्याचा धाकटा भाऊ अरबाज खानविषयी बोलायचे झाले, तर त्याने बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न केले होते. पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर, 12 डिसेंबर 1998 रोजी या जोडप्याचे लग्न झाले. अचानक दोघांमध्ये दुरावा आला आणि 2016 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

सोहेल खान- सीमा सचदेव
या यादीमध्ये केवळ अरबाज खानच नव्हे, तर सोहेल खानचेही नाव समाविष्ट आहे. सोहेलचे लग्न हिंदू कुटुंबातील सीमा सचदेव हिच्याशी झाले आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा सोहलेचा ‘प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याच रात्री सोहेलने सीमाला पळवून नेऊन लग्न केले. दोघांनीही सन 1998 मध्ये आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. लग्नानंतर या दोघांच्या कुटुंबियांनी या जोडप्याला स्वीकारले.

सैफ अली खान- करीना कपूर
सैफ अली खाननेही एक नव्हे, तर दोन हिंदू महिलांसह लग्न केले आहे. त्याची पहिली पत्नी अमृता सिंग होती. तिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याने सन 2012 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर सोबत लग्न केले.

इमरान खान- अवंतिका मलिक
‘जाने तू या जाने ना’ द्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारा आमिर खानचा पुतण्या इमरान खाननेही एका हिंदू मुलीसोबत लव्ह मॅरेज केले आहे. इमरानने अवंतिका मलिकला 8 वर्ष डेट केले. ज्यानंतर या दोघांचे लग्न झाले. काही वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. 2019 मध्ये अशी बातमी आली की, अवंतिका इमरानचे घर सोडून त्याच्यापासून विभक्त राहत आहे.

इरफान खान- सुतापा सिकंदर
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणार्‍या दिवंगत अभिनेता इरफान खाननेही एका हिंदू मुलीशी लव्ह मॅरेज केले. 1995 मध्ये त्याने सुतापा सिकंदरशी लग्न केले.

फरदीन खान- नताशा माधवानी
एकेकाळी चित्रपटांमध्ये आपल्या गोंडस हास्याने कोट्यवधी मुलींची मने जिंकणाऱ्या फरदीन खानने हिंदू मुलगी नताशा माधवानीला आपला साथीदार बनवले. नताशा माधवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री मुमताजची मुलगी आहे. साल डिसेंबर 2005 मध्ये, या जोडप्याने विवाह केला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा- 

-विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा चढणार लग्नाच्या बोहल्यावर? अभिनेत्याने केली मोठी घोषणा

-‘या’ अभिनेत्याचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून तुम्ही व्हाल थक्क, केले तब्बल १८ किलो वजन कमी

-नादच खुळा! यूट्यूबवर १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करणारी पहिली युवा गायिका; ‘या’ दोन गाण्यांनी बनवला विक्रम

हे देखील वाचा