Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड ऐकावे ते नवलंच! शोलेच्या फाईट सीनमध्ये दिसला ठाकूरचा हात, ४६ वर्षांनी होतोय व्हिडीओ व्हायरल

ऐकावे ते नवलंच! शोलेच्या फाईट सीनमध्ये दिसला ठाकूरचा हात, ४६ वर्षांनी होतोय व्हिडीओ व्हायरल

आजही जेव्हा ‘शोले’ हा चित्रपट टीव्हीवर येतो, तेव्हा लोक त्याला मोठ्या उत्साहाने पाहतात. या चित्रपटात धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांनी ‘जय-वीरू’ची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटाच्या पडद्यावरील ही मैत्री आजही प्रेक्षकांसाठी मैत्रीचे एक उत्तम उदाहरण आहे. त्याच वेळी संजीव कुमार ठाकूरची भूमिका साकारून अमर झाले. या चित्रपटाची प्रत्येक गोष्ट जबरदस्त होती, मग तो अभिनय असो किंवा पटकथा. पण तरीही एखादी कमी राहूनच जाते. शोलेच्या बाबतीतही असेच काही घडले.

चित्रपटाचे प्रत्येक सीन खूप खास आहेत. मग ठाकूर आणि गब्बरसिंग यांच्यातील हाणामारीबद्दल तर न बोललेलंच बरं! हा एक निराळा लढा होता, ज्यामध्ये ठाकूर हात नसताना गब्बरशी लढत असतो. सेवानिवृत्त पोलिस अधिकारी ठाकूर बलदेवसिंग याचे दोन्ही हात गब्बरसिंगने कापले असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले.

नंतर, जय-वीरूच्या मदतीने, ठाकूर गब्बरचा सूड घेतो आणि हात नसताना देखील त्याला टक्कर देतो. मात्र या सीनमध्ये ठाकूरचा हात दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात कुर्त्याखालून त्याचा हात स्पष्टपणे दिसू शकतो. ठाकूर आणि गब्बरसिंग यांच्यातील लढ्याच्या सीनचा हा व्हिडिओ यूट्यूबवरही उपलब्ध आहे. प्रेक्षक हा सीन पाहून जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

अमजद खानने ‘शोले’ चित्रपटात गब्बरसिंगची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे लेखन सलीम-जावेद जोडीने केले होते. तर दिग्दर्शन गोपाळ दास सिप्पी यांनी त्यांचा मुलगा रमेश सिप्पीसोबत केले होते. या चित्रपटात हेमा मालिनी, जया बच्चन (जया भादुरी), असारानी, जगदीप यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. आजही या चित्रपटाचे डायलॉग बर्‍याच प्रसंगी बोलले जातात.

हे देखील वाचा