Monday, July 1, 2024

रामायणापासून ते महाभारतापर्यंत ‘या’ कलाकारांनी केला आहे राजकारणात प्रवेश; जाणून घ्या त्यांच्याबद्दल

एक काळ असा होता, जेव्हा चित्रपटसृष्टीत काम करणारे कलाकार फक्त यातच झोकून काम करत असत. अगदी बोटावर मोजण्याइतके कलाकार राजकारणात प्रवेश करत असत. परंतु आज पाहायला गेलं, तर चित्रपटसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. आताच रामायण या मालिकेत श्रीराम प्रभूंची भूमिका निभावणारे अरुण गोविल यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी बंगालची विधानसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त आणखी असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी अभिनय सोडून राजकरणात प्रवेश केलाय. जाणून घेऊया अशाच काही काळ कलाकारांबद्दल…

अरुण गोविल
रामायणात श्रीराम प्रभूंची भूमिका निभावून घराघरात पोहोचलेले अभिनेते अरुण गोविल यांनी बीजेपी पक्षात प्रवेश केला आहे. लॉकडाऊन दरम्यान रामायण ही मालिका पुन्हा दाखवण्यात आली. त्यामुळे त्यांची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

दारा सिंग
रामायणामध्ये हनुमानाचे पात्र साकारणारे दारा सिंग हे घराघरात पोहोचले. हनुमानाची त्यांची भूमिका पाहून प्रेक्षक त्यांची पूजा करायला लागले. दारा सिंह कधीही राजकीय पक्षात सामील झाले नाहीत, परंतु ते भाजपचे नामित सदस्य झाले होते. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.

नितीश भारद्वाज
पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका निभावलेल्या नितीश भारद्वाज यांची चाहते पूजा करत असतं. ते देखील भाजपचे सदस्य आहेत. त्यांनी 1996 मध्ये झारखंडमधील निवडणूक लढली होती. त्यात त्यांना यश देखील मिळाले होते.

रूपा गांगुली
महाभारतात द्रौपदी बनून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना तिच्या प्रेमात पडणारी अभिनेत्री रूपा गांगुली देखील राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. मागच्या विधानसभेत त्यांनी हावडा उत्तर येथून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजय प्राप्त झाला होता.

अरविंद त्रिवेदी
रामायणात रावणाची हुबेहूब भूमिका निभावले अरविंद त्रिवेदी भाजप पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी 1991 मध्ये गुजरातमधील लोकसभा निवडणूक लढली होती. त्यात त्यांना यश मिळाले होते.

दीपिका चिखलिया
रामायणमधील सीता म्हणजेच दीपिका चिखलिया यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढली होती. तसेच विजय देखील मिळवला होता. दीपिकाने गुजरातमधील वडोदरा येथून 1991 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भाजपला मिळाला पडद्यावरील ‘श्रीराम’, वाचा रामायणाद्वारे घराघरात पोहोचलेल्या अभिनेते अरुण गोविलांबाबत काही खास गोष्टी

-‘या’ कारणामुळे बनावे लागले अभिनेत्री; वयाच्या सोळाव्या वर्षीच बांधली होती लग्नगाठ, वाचा ७ फिल्मफेअर अवॉर्ड जिंकणाऱ्या अभिनेत्रीबद्दल

-पुणे एफटीआयमध्ये आपल्या बॅचचे टॉपर होते ‘नवीन निश्चल’, मिळाला जसा हवा होता तसाच मृत्यू, टाका एक नजर

हे देखील वाचा