Wednesday, July 3, 2024

विरुष्काच्या पहिल्या भेटीचा ‘तो’ किस्सा होता विराटला अस्वस्थ करणारा; वाचा काय घडले होते त्यावेळी?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतेच आई- बाबा झाले आहेत. आपल्याला मुलगी झाल्याची बातमी त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेयर केली होती. विराट आणि अनुष्का हे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले कोणते ना कोणते फोटो नेहमी पोस्ट करत असतात. आपल्या लग्नाला चार वर्षे होऊन देखील हे जोडपे एकमेकांवर तितकेच प्रेम करत असतात. ते त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओमार्फत नेहमी दिसत असते. त्यांची पहिली भेट कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया…

आपल्या पर्सनल लाईफबद्दल काहीजण फार कमी बोलतात. पण आता विराटने अनुष्कासोबत आपली पहिली भेट कशी झाली यावर भाष्य केले आहे. त्याने एका मुलाखतीदरम्यान या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यांच्या दोघांच्या पहिल्या भेटीची कहाणी फार रंजक आहे. एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान हे दोघे प्रथमच एकमेकांना भेटले होते. ज्यावेळी तो सेटवर पोहोचला होता, तेव्हा तो फार नर्व्हस दिसत होता. कारण त्याची उंची अनुष्कापेक्षा कमी होती. त्यावेळी अनुष्काने उंच हिल्स घातल्या होत्या.

विराटची उंची कमी असल्याने त्याने अनुष्काच्या टीमला तिने उंच हिल्स घालू नये असे सांगितले, अनुष्काने देखील त्याची ही गोष्ट मान्य केली होती. तरीसुद्धा त्यानंतर पण तो नर्व्हसच दिसत होता. तिने उंच हिल न घालून पण ती विराट पेक्षा उंचच दिसत होती. तिच्या उंच हिल्स पाहून विराटने एक जोक मारला होता. तो म्हणाला होता की, तिला सांगायला हवे होते की मी सहा फूट उंच नाहीये आणि त्यामुळे इतक्या मोठ्या हिल्स घालू नये. विराटने केलेल्या वक्तव्यावर अनुष्का शर्मा त्याला ‘एक्सक्यूज मी’ अशी म्हणाली होती. त्यानंतर अनुष्काचा मूड हलका करण्यासाठी विराट केवळ मजा- मस्ती करत राहिला. त्यांचा हा किस्सा अजूनपण आठवला तरी त्याला फार हसू येते.

यांनतर विराट आणि अनुष्का यांच्यात भेटीगाठी सुरू झाल्या. मग दोघांमधील प्रेम वाढू लागल्याचे बोलले जात होते. अनेक महिने एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला होता. अनुष्काच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ आणि ‘पीके’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी तो तिला भेटायला यायचा. दरम्यान त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यांनतर युवराज सिंगच्या लग्नात आणि जहीर खानच्या वेडिंग रिसेप्शनला हे दोघे पुन्हा एकत्र दिसले होते.

त्या दोघांनी एका वेडिंग ड्रेसच्या जाहिरातीसाठी शूट केले होते, तेव्हा ते फोटो देखील फार व्हायरल झाले होते. त्यांनतर चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी इटलीमध्ये लग्न केले. आज त्यांना वामिका नावाची मुलगी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संगीतकाराने भावाच्या नावालाच बनवले आपले आडनाव, म्हणाला ‘माझं नाव साजिद वाजिद असं आहे आणि…’

-‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

-बनायचे होते अभिनेता, पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत गायकाने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा

हे देखील वाचा