‘कामयाब नहीं काबिल बनो, काबिल बनोगे तो कामयाबी झक मार के पीछे आयेंगी’ आपल्या या सुपरहिट डायलॉगने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बॉलिवूडमधील ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणजेच आमिर खान. त्याने केवळ देशातच नाही तर अगदी परदेशातही आपले नाव कमावले आहे. त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीत आपली एक वेगळीच ओळख बनवली आहे. आमिर खानचे नाव त्या सुपरहिट कलाकारांच्या यादीत येते, ज्याच्यासोबत प्रत्येक अभिनेत्रीला काम करण्याची इच्छा असते. त्याने एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहे. त्याने जवळपास सगळ्याच चित्रपटात किसिंग सीन दिले आहेत. पण एका चित्रपटात अभिनेत्रीने किसिंग सीन देण्यास नकार दिला होता. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही, तर जुही चावला ही आहे.
आमिर खान (aamir khan) आणि जुही चावला (juhi chawala) ही जोडी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट जोडी आहे. प्रेक्षकांनी त्यांच्या जोडीला खूप प्रेम दिले आहे. आमिर खानने ‘होली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. या चित्रपटतून जुही चावला ही देखील चांगलीच लोकप्रिय झाली. तिने ‘सल्तनत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात जुही चावला आणि आमिर खान यांच्यामध्ये एक किसिंग सीन होता. जो सीन करण्यासाठी जुहीने पूर्णपणे नकार दिला होता. तिने नकार दिल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक मंसुर खान यांना खूप राग आला आणि त्यांनी शूटिंग थांबवली होती.
जुहीने नकार दिल्यानंतर मंसुर खानने सगळ्यांना सांगितले की, तुम्ही जे काही काम करत आहात ते थांबवा आणि बसून राहा. नंतर मग जुही किसिंग सीन करायला तयार झाली आणि चित्रपटाची शूटिंग पुन्हा चालू झाली.
या व्यतिरिक्त आमिर आणि जुहीने ‘इश्क’ या चित्रपटात देखील एकत्र काम केले आहे. या चित्रपटात काजोल आणि अजय देवगण हे सुद्धा होते. या चित्रपटात त्या दोघांचा अत्यंत विनोदी आणि रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो. या शिवाय त्या दोघांनी ‘हम है राही प्यार के’, ‘तुम मेरे हो’, ‘दौलत की जंग’ या चित्रपटातही एकत्र काम केले आहे.(april 2021 juhi chavla refused to give kissing seen with aamir khan 2)
हेही वाचा-
–जुही चावलाची मस्करी आमिरला पडलेली महागात, अभिनेत्रीने 5 वर्ष पाहिले नव्हते ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चे तोंड
–‘या’ व्यक्तीची दुसरी पत्नी बनली जुही चावला? अनेक वर्षांनी केला लग्न लपवण्यामागचा खुलासा