Sunday, September 8, 2024
Home अन्य नादच खुळा! यूट्यूबवर १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करणारी पहिली युवा गायिका; ‘या’ दोन गाण्यांनी बनवला विक्रम

नादच खुळा! यूट्यूबवर १०० कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करणारी पहिली युवा गायिका; ‘या’ दोन गाण्यांनी बनवला विक्रम

एका गाण्याने रातोरात यूट्यूबवरील सर्व रेकॉर्ड तोडणारी सर्वात तरुण गायिका म्हणजे ध्वनी भानुशाली. ती एका रात्रीतच पॉप सेंसेशन बनली आहे. इतक्या कमी वयात एवढी लोकप्रियता मिळवणारी ध्वनी ही पहिलीच गायिका आहे. तिची प्रत्येक गाणी सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालताना दिसतात. आजच्या तरुणाईला आवडेल आणि रुचेल अशी गाणी ध्वनी प्रेक्षकांसमोर घेऊन येत असते.

ध्वनीचा जन्म 22 मार्च 1998 रोजी मुंबई येथे झाला होता. तिने तिचे शिक्षण मुंबई आणि देहरादून येथून पूर्ण केले. ती टी- सीरिजचे अध्यक्ष विनोद भानुशाली यांची मुलगी आहे. वयाच्या 21व्या वर्षी यूट्यूबवर 100 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेली ध्वनी ही पहिली युवा महिला गायिका आहे.

एका मुलाखतीत ध्वनीने सांगितले होते की, “जुन्या सुपरहिट गाण्यांना आजच्या काळाचा थोडा टच देऊन रिमेक करणे काही चुकीचे नाही. परंतु त्या गाण्यातील मूळ भाव बदलता कामा नये. जुन्या गाण्यांना रिमेक करणे म्हणजे, त्या प्रतिभावंत गायकांना त्रिब्युट देण्यासारखे आहे. त्यामुळे आपण खूप काळजीपूर्वक रिमेक केले पाहिजे. मी असं नाही म्हणत की, आजकालची गाणी चांगली नसतात, पण या पद्धतीच्या फ्युजनची देखील त्यांची एक स्टाईल असते. ज्याला प्रेक्षकांनी खूपच पसंती दर्शवली आहे.”

तिला जेव्हा नेपोटिझमवरून टोमणे मारण्यात आले, तेव्हा तिने प्रेक्षकांना उत्तर दिले की, तिचे वडील तिला काम देऊ शकतात, पण तिची जागा आणि ओळख तिलाच मिळवायची आहे. तिच्या वडिलांच्या नावाने ती तिची जागा नाही बनवू शकत.

काही दिवसांपूर्वी ध्वनीने एका व्यक्तीसोबत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, आणि वर लिहिले होते की, क्रश. यासोबतच तिने काॅप्शनमध्ये लिहले होते की, “तू मला खूप आनंदी ठेवतोस, आय लव यू.”

ध्वनीचे ‘लेजा लेजा’ हे गाने खूपच प्रसिद्ध झाले. त्यानंतर तिच्या ‘वास्ते’ या गाणेही प्रसिद्ध झाले. या दोन्ही गाण्यांनी 100 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार करत यूट्यूबचे सगळे रेकॉर्डस मोडून टाकले होते. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘नयन’ हे गाणे देखील प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तिला सगळेजण ‘बिलियन बेबी’ देखील म्हणतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एक दिवस ‘त्या’ दिग्दर्शकाने कंगनाला एका कॅफेमध्ये पाहिले, अन् स्ट्रगलर कंगनाला पहिला रोल मिळाला

-एकेवेळी सिगारेटच्या प्रचंड आहारी गेलेले बॉलीवूड कलाकार, आज समाजासाठी झालेत आदर्श व्यक्ती

-अज्ञात व्यक्तीने केली जॉनी डेपच्या घरात घुसखोरी, दारुचे घोट आणि बाथरुममध्ये घेतली आंघोळीची मजा

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा