Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ‘असं’ जुळलं विनोदी अभिनेता राजपाल यादवचं राधाशी नातं, पहिल्या भेटीचा किस्सा केला शेअर

‘असं’ जुळलं विनोदी अभिनेता राजपाल यादवचं राधाशी नातं, पहिल्या भेटीचा किस्सा केला शेअर

बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता राजपाल यादव याने गेल्याच महिन्यात आपला ५०वा वाढदिवस साजरा केला. त्याने आपल्या विनोदी अभिनयाने सगळ्या प्रेक्षकांना खदखदून हसवले आहे. ‘ढोल’ असो किंवा ‘भागम भाग’ हा चित्रपट असो आपल्या प्रत्येक भूमिकेने त्याने सगळ्यांना आनंदित केले आहे. त्याच्या या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळाले आहे. एक काळ तर असा होता जेव्हा फक्त त्याचं नाव ऐकूनच चित्रपट हीट होत असत. त्याने आपल्या करिअरची सुरुवात अनेक छोटे- मोठे पात्र निभावून केली आहे. परंतु राम गोपाळ वर्मा यांच्या ‘जंगल’ चित्रपटाने त्याला खरी ओळख मिळाली. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांमुळे देखील प्रेक्षकांच्या चर्चेत होता. चला तर आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याची प्रेम कहाणी.

रामपाल यादवने त्याच्या आयुष्यात दोन लग्न केली आहेत. त्याने दुसरे लग्न त्याच्यापेक्षा नऊ वर्षाने लहान असणाऱ्या राधा नावाच्या मुलीसोबत केले आहे. त्याच्या पहिल्या बायकोचे नाव करुणा हे होते. करूणाचा मृत्यू त्याच वेळेस झाला, जेव्हा तिने तिच्या मुलीला जन्म दिला. राजपालला त्यानंतर लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतु राधासोबत मैत्री झाल्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले.

त्याने 10 मे 2003 मध्ये राधासोबत लग्न केले. एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या प्रेमाचा खुलासा करताना सांगितले होते की, “माझी बायको राधा ही माझ्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. आमच्या दोघांचा प्रेमविवाह आहे. राधा आणि माझी भेट कॅनडामध्ये झाली, जेव्हा मी ‘द हीरो’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो.”

राजपालने सांगितले की, “आमच्या दोघांचाही मित्र असलेल्या आमच्या कॉमन फ्रेंडने आमची भेट घडवून आणली होती. आम्ही दोघे 10 दिवस कॅनडामध्ये सोबत राहिलो. कॅनडावरून परत आल्या नंतरही आम्ही दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. आमच्या भेटीनंतर राधा 10 महिन्यांनी कॅनडा सोडून भारतात आली. त्यावेळी आम्ही खूप वेळ फोनवर बोलत असायचो त्यामुळे फोनचं बिल देखील खूप असायचं.”

तेव्हा त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल राधाने सांगितले होते की, “मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आले होते, तेव्हा राजपाल मला त्याच्या घरी घेऊन गेला होता. त्याने मला सरप्राईझ देण्यासाठी त्याच्या घराचं इंटेरियर अगदी तसच बनवलं होतं, जसं कॅनडाच्या हॉटेलच होतं.”

त्यानंतर त्या दोघांनी सन 2003 मध्ये लग्न केले होते. त्या दोघांना 2 मुली आहेत. त्याच्या पहिल्या बायकोची मुलगी ज्योती हिचे लग्न झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

-बनायचे होते अभिनेता, पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत गायकाने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा

-सुपरस्टार राजेश खन्ना यांनी बिग बींचा अपमान केल्यानंतर, जया बच्चन यांनी दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

हे देखील वाचा