Friday, July 5, 2024

‘कल्लू मामा’ची भूमिका साकारून गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य; वाचा सौरभ शुक्ला यांचा जीवनप्रवास

सौरभ शुक्ला म्हटले की बॉलीवूडचा ‘कल्लू मामा’ हे नाव नाव लक्षात येतं. ज्याबद्दल कोणताही परिचय देण्याची गरज पडत नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी मुख्य भूमिकेत नसतानाही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. सौरभ शुक्ला हे त्या मोजक्या कलाकारांपैकीच एक आहेत. त्यांचा प्रवास आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

लहानपणापासूनच होती अभिनयाची आवड
सौरभ शुक्ला यांचा जन्म 5 मार्च 1963 रोजी झाला होता. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे जन्मलेल्या सौरभ यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तसेच, त्यांना या कलेचा वारसा घरातूनच मिळाला होता. सौरभ यांची आई जोगमाया शुक्ला या भारताच्या पहिल्या महिला तबला वादक होत्या, तर वडील शत्रुघ्न शुक्लाही सुप्रसिद्ध आगरा घराण्याचे संगीतकार होते. यामुळे घरातूनच सौरभ यांना कलेचे वातावरण मिळाले.

नॅशनल स्कुल ड्रामा मधून घेतले अभिनयाचे धडे
सौरभ यांच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांचे कुटुंब दिल्लीला गेले. दिल्लीतच सौरभ यांचे शिक्षण झाले होते. त्यांनी खालसा महाविद्यालयातून पदवी संपादन केली. पण सौरभ यांचे स्वप्न काही वेगळे होते. त्यांना अभिनयाची आवड होती, म्हणूनच 1984 मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचा प्रवास सुरू केला.

थिएटर शिकण्याबरोबरच सौरभ यांना कामही मिळाले. त्यांनी अनेक उत्कृष्ट नाटकांतून आपल्या अभिनयाची कौशल्ये दाखविली आणि यासाठी त्यांचे कौतुकही झाले. त्यांनी ‘एक व्ह्यू ऑफ द ब्रिज’, ‘लुक बॅक इन अँगर’, ‘घासीराम कोतवाल’ अशी अनेक नाटके केली आहेत. या सर्व नाटकांमध्ये त्यांच्या अभिनयाची भरभरुन प्रशंसा झाली.

‘बँडिट क्वीन’ चित्रपटातून केले बॉलिवूडमध्ये पदार्पण
थिएटर चालू होते पण त्यांचे ध्येय वेगळेच होते. स्वप्न साकार करण्यासाठी सौरभ मुंबईकडे वळले आणि इथूनच त्यांचे भविष्य बदलले. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सौरभ यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला होता. त्यांनी त्यांच्या ‘बँडिट क्वीन’ चित्रपटात सौरभ यांना कास्ट केले होते आणि यामुळेच त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. ‘बँडिट क्वीन’ चित्रपटातील त्यांचा अभिनय चांगलाच गाजला. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्यांनी ‘इस रात की सुबह नहीं’, ‘करीब’ आणि ‘जख्म’ यांसारख्या चमकदार चित्रपटांमध्ये काम केले.

‘सत्या’ चित्रपटात ‘कल्लू मामा’च्या भूमिकेने मिळाली खरी ओळख
सौरभ यांच्या अभिनयाची गाडी तर चालू होती, परंतु तरीही एक कमतरता होती. दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी ही कमतरता पूर्ण केली. राम गोपाळ वर्मा यांनी सौरभला त्यांच्या ‘सत्या’ चित्रपटात कल्लू मामाची भूमिका दिली. या भूमिकेमुळे बॉलिवूडमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये त्यांना आजही प्रत्येकजण ‘कल्लू मामा’ या नावाने ओळखले जाते. कल्लू मामाच्या भूमिकेत सौरभ यांची भूमिका खूप गाजली होती.

‘सत्या’ चित्रपटाचे लेखकही आहेत सौरभ
एकदा स्वत: सौरभ यांनी खुलासा केला होता की, त्यांना या चित्रपटात काम करायचे नव्हते, फक्त कल्लू मामाच्या भूमिकेमुळेच त्यांनी चित्रपटात काम केले होते. तसेच, सौरभ आणि अनुराग कश्यप यांनी एकत्र या चित्रपटाची पटकथा लिहिली होती, म्हणजेच सौरभ हे ‘सत्या’चे लेखकही आहेत.

चित्रपटाच्या पडद्यावर, सौरभ यांनी प्रत्येक सुपरहिट अभिनेत्याबरोबर काम केले. यादरम्यान त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. त्यांनी ‘हे ​​राम’, ‘स्लमडॉग मिलियनेअर’, ‘ये साली जिंदगी’, ‘बर्फी’, ‘जॉली एलएलबी’, ‘पीके’, ‘जॉली एलएलबी 2’, ‘रेड’, ‘बाला’ आणि ‘छलांग’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संगीतकाराने भावाच्या नावालाच बनवले आपले आडनाव, म्हणाला ‘माझं नाव साजिद वाजिद असं आहे आणि…’

-‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

-बनायचे होते अभिनेता, पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत गायकाने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा

हे देखील वाचा