Saturday, June 29, 2024

खरंय होय! चित्रपटात ‘या’ अभिनेत्रींचे आवाज झाले होते डब; श्रीदेवीचाही यादीत समावेश

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शूटिंग करताना, भाषा आणि उच्चारण समस्यांचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत चित्रपटांचे निर्माता-दिग्दर्शक अनेकदा संवादासाठी दुसर्‍या कलाकार किंवा अन्य अभिनेत्रींची मदत घेत असत. आज आम्ही तुम्हाला अशाच बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा पदार्पण चित्रपटात आवाज डब केला गेला होता.

श्रीदेवी
श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1967 मध्ये ‘मुरुगा’ या तमिळ चित्रपटात बाल कलाकार म्हणून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, तर बॉलिवूडमध्ये तिने 1979 साली ‘सोलवां सावन’ या चित्रपटातून पदार्पण केले. तथापि, तिच्या पहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी केली नाही. श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये सुरुवात केली, तेव्हा तिला हिंदी भाषा बोलण्याची सवय नव्हती. म्हणूनच हिंदी चित्रपटांमधील तिचा आवाज बहुतेकदा डब केला जात असे. ‘आखरी रास्ता’ चित्रपटात श्रीदेवीचा आवाज अभिनेत्री रेखाने डब केला होता. तिने प्रथम ‘चांदनी’ चित्रपटातून स्वतःच्या डायलॉगसाठी डबिंग केले होते.

बिपाशा बासू
अभिनेत्री बिपाशा बासूने आपल्या कारकिर्दीची सुरूवात अब्बास मस्तानच्या क्राईम थ्रिलर ‘अजनबी’ पासून केली होती. या चित्रपटात बिपाशासोबत अक्षय कुमार, बॉबी देओल आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात बिपाशाने एक नकारात्मक व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच, या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पण ‘अजनबी’ चित्रपटातील तिचे डायलॉग दुसर्‍याच्या आवाजात होते हे फार कमी लोकांना माहिती असेल. ‘अजनबी’ शिवाय ‘राज’ आणि ‘जिस्म’ सारख्या प्रसिद्ध चित्रपटातही बिपाशाचा आवाज डब केला गेला आहे.

प्रीति झिंटा
प्रीति झिंटा बॉलिवूडमधील तिच्या अनेक चांगल्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. पहिल्या चित्रपटामध्ये प्रीति झिंटाने अविवाहित किशोरवयीन गर्भवती मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट होता ‘क्या कहना.’ त्याच वेळी, प्रमुख अभिनेत्री म्हणून तिने ‘सोल्जर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1998 साली आलेल्या या चित्रपटात प्रीतिसह बॉबी देओल दिसला होता. मात्र, चित्रपटाला प्रीतिचा मूळ आवाज नव्हता. तिचा आवाज डब केला होता.

जॅकलिन फर्नांडिस
सन 2006 मध्ये मिस श्रीलंका युनिव्हर्स बनलेली जॅकलिन फर्नांडिस ही श्रीलंकेची अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अलादिन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटात तिचा मूळ आवाज नव्हता, तर तो डब केला गेला होता.

‘मर्डर 2’ आणि ‘हाऊसफुल 2’ मध्येही जॅकलिनचे डायलॉग्ज डब केले गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-धक्कादायक! भोजपुरी अभिनेत्याकडे सापडल्या ५० लाख रुपयांच्या बनावट नोटा, सापळा रचून केली पोलिसांनी अटक

-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’

-दुःखद!! अभिनेता हेनरी डॅरो यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन

हे देखील वाचा