Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड मलायका अरोराची हॉटनेस पुन्हा चर्चेत; स्विमिंग पूलवरील फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा!

मलायका अरोराची हॉटनेस पुन्हा चर्चेत; स्विमिंग पूलवरील फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा!

चित्रपटांपासून दूर असूनही मलायका अरोरा नेहमी चर्चेत असते. मलायका अरोरा फिटनेसबरोबरच तिच्या बोल्ड स्टाईलनेही सोशल मीडिया युजर्सची मनं जिंकत असते. अशा परिस्थितीत, मलायकाने पुन्हा एकदा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे इंटरनेटचा पारा भलताच वाढला आहे.

मलायकाने जे फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये करड्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. फोटोत असे दिसून येत आहे की, मलायका स्विमिंग पूलच्या काठावर बसलेली आहे आणि ती अगदी मस्त स्टाईलमध्ये पोज देत आहे. मलायकाची पाण्याबरोबर खेळण्याची अदा पाहून चाहते पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत.

मलायका अरोराने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “उन्हाळा इथे आहे.” मलायकाच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे आणि अल्पावधीतच या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडला आहे. त्याचबरोबर हजारो चाहते कमेंट करून मलायकाचे कौतुक करत आहेत. यापूर्वीही तिने स्विमिंग पूलवरील फोटो शेअर केले होते.

मलायका अरोरा फिटनेस आणि बोल्ड लूक व्यतिरिक्त, अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळेही चर्चेत असते. मात्र, याबद्दल दोघांनीही अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. तसेच, दोघांना अनेकदा एकमेकांसमवेत वेळ घालवताना पाहिले जाते.

मलायकाने 1998 साली बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अरबाज खानशी लग्न केले होते. अरबाजशी तिची भेट एका कॉफी अ‍ॅड शूट दरम्यान झाली होती. तेव्हापासून तिला मलायका अरोरा खान म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र, 28 मार्च 2016 रोजी त्यांनी नात्यात समस्या येत असल्या कारणाने, विभक्त होण्याची घोषणा केली. 11 मे 2017 रोजी या दाम्पत्याचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर, मुलगा अरहान खानची कस्टडी आई मलायकाला मिळाली. तेव्हापासूनच मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ही तर जलपरी’, आलिया भट्टचा अंडरवॉटर बिकिनी फोटो पाहून चाहत्यांची झक्कास प्रतिक्रिया

-अभिनेत्री पूजा बेदीच्या ‘या’ कंडोम जाहिरातीने उभा ठाकला होता वाद, दूरदर्शनवर केली होती बंद, पाहा बोल्ड फोटो

-निया शर्माचे बाथटबमधील फोटो करतायत सोशलवर धमाल, प्रेक्षकांचा मिळतोय भरभरून प्रतिसाद

हे देखील वाचा