Wednesday, June 26, 2024

जया बच्चनच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे रेखा झाली होती बिग बींपासून कायमची दूर; पाहा नेमकं काय होतं प्रकरण

बॉलिवूडमधील काही अशा प्रेमकथा आहेत ज्या कधीही न विसरता येण्यासारख्या आहेत. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यामधील अफेअर हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित अफेअर आहे. रेखाची जोडी अमिताभ बच्चन यांच्यासोबत सर्वाधिक हिट ठरली होती, त्यामुळे त्यांची ही केमिस्ट्री आजही चर्चेचा विषय असल्याचे बोलले जाते. अनेक बातम्यांमूळे जया आणि अमिताभ यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते.

रेखा यांच्या व्यवसायिक जीवनाबद्दल जितके बोलले जाते, तितकेच व्यक्तिगत आयुष्याबद्दल देखील बोलले गेले आहे. रेखा यांचे नाव बऱ्याच जणांशी जोडले गेले होते. पण ती कोणाबरोबर जास्त चर्चेत होती ते नाव म्हणजे अमिताभ बच्चन. या दोघांच्या प्रेमकथा आजही बी- टाऊन मध्ये तितक्याच प्रसिद्ध आहेत.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, जयाशी लग्न झाल्यावर देखील अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा जोर धरून लागल्या होत्या. इतकेच नव्हे, तर लग्नानंतरही अमिताभ यांची रेखा यांच्यासोबत जवळीक वाढली होती. या सर्व गोष्टींचा परिणाम तिघांच्या नात्यावर झाला होता. यायाबत सर्वाधिक तेव्हा चर्चा झाली, जेव्हा ऋषी कपूरच्या लग्नात रेखा सिंदूर लावून आल्या होत्या. त्यांच्या या अफेअरच्या चर्चा रंगत असतानाच रेखा आई बनणार आहे अशी बातमी देखील अधिक वेगाने पसरत चालली होती, त्यामुळे जया, रेखा आणि अमिताभ यांच्याबद्दल खूप वक्तव्य केले जात होते.

रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरबद्दल जया बच्चन यांना कळले, तर आपले वैवाहिक जीवन उध्वस्त होईल अशी त्यांना भीती वाटायला लागली. त्यावेळी जया बच्चन यांनी योग्य पाऊल उचलत एक निर्णय घेतला. दरम्यान अमिताभ बच्चन यांना एका शूटिंगसाठी मुंबईबाहेर जावे लागणार होते. हा दिवस साधून जया यांनी रेखा यांना फोन केला. रेखा यांना फोन केला, तेव्हा त्या फार घाबरल्या होत्या. जया आपल्याला वेडेवाकडे काहीतरी बोलेल, अशी त्यांना भीती वाटायला लागली होती, पण तसे झाले नाही.

जया बच्चन यांनी रेखा यांना फोन करून आपल्या घरी खूप साधेपणाने जेवायला आमंत्रित केले. रेखा यांना असे वाटले की, ज्याने आपल्याला फोन करून घरी बोलवून आपला अपमान करण्याचा त्यांचा उद्देश आहे. अखेर आपला जीव मुठीत धरून त्या घरी जेवायला गेल्या. त्यावेळी दोघेही एकमेकींशी चांगले बोलत होत्या. आणि अमिताभच्या नावाचा उल्लेख देखील त्यांनी आपल्यात झालेल्या संभाषणादरम्यान केला नाही. जेवण झाल्यावर रेखा जेव्हा आपल्या घरी जायला निघाल्या, तेव्हा जया त्यांना दारापर्यंत सोडायला आल्या होत्या. पण त्याच वेळी ती असे काही बोलली जे ऐकून रेखाला जबर धक्का बसला.

जया यांचे रेखा यांच्यासाठी ते वाक्य होते की, ‘काहीही झाले तरीही मी अमिताभला सोडणार नाही.’ हे वाक्य ऐकून ती पूर्णपणे स्तब्ध झाली. त्यानंतर अनेकदा त्यांच्या या जेवणाचे किस्से उघड झाले. परंतु त्यांनी या सर्वांवर पडदा टाकत गप्प बसायचे ठरवले. अमिताभ यांना या गोष्टीबद्दल समजले, तेव्हा त्यांनी रेखापासून दूर राहणेच पसंत केले. त्यांनाही तेव्हा कळले होते की, जया यांना रेखा आणि त्यांच्या अफेअरबद्दल सर्व समजले आहे. आपल्या सिलसिला या चित्रपटानंतर ते दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत.

अमिताभ आणि रेखाने पहिल्यांदा ‘दो अनजाने’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यात दोघांनी पती पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘मूकद्दर का सिकंदर’ हा या दोघांचा दुसरा चित्रपट. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर अमिताभ आणि रेखा यांच्या ‘सुहाग’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली होती. सिलसिला हा चित्रपट अमिताभ आणि रेखाच्या लव्हस्टोरीसाठी आजही ओळखला जातो. तसेच या चित्रपटात जया बच्चन देखील होत्या. ज्या ज्या वेळी अमिताभ यांच्या रोमान्सची चर्चा होते, त्यावेळी या चित्रपटाचे नाव आवर्जून घेतले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कल्लू मामा’ची भूमिका साकारून गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य; वाचा सौरभ शुक्ला यांचा जीवनप्रवास

-विरुष्काच्या पहिल्या भेटीचा ‘तो’ किस्सा होता विराटला अस्वस्थ करणारा; वाचा काय घडले होते त्यावेळी?

-संगीतकाराने भावाच्या नावालाच बनवले आपले आडनाव, म्हणाला ‘माझं नाव साजिद वाजिद असं आहे आणि…’

हे देखील वाचा