Friday, July 5, 2024

‘एक लाजरानं साजरा मुखडा!’ ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीच्या साडीतील अदा पाहून प्रत्येकजण झाला फिदा!

मराठी सिनेमाची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी ग्लॅमरस लूकमधील तिचे एकामागून एक फोटो शेअर करत राहते. ‘हिरकणी’ अभिनेत्री आपल्या स्टाईलिश अंदाजाने चाहत्यांनी मने जिंकण्याची कोणतीही कसर राहू देत नाही. सोशल मीडियावर बरीच सक्रिय असणारी सोनाली, सतत तिचे लेटेस्ट फोटोशूट आणि व्हिडिओ इंस्टाग्राम हँडलद्वारे चाहत्यांसमोर सादर करत असते.

सोनालीने नुकताच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या साडीसोबत खेळताना दिसली आहे. व्हिडिओमधील सोनालीच्या अदा पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल! व्हिडिओच्या पार्श्वभूमीमध्ये ‘लाजरान साजरा मुखडा’ हे गाणे वाजत आहे.

 

सोनालीच्या या पारंपारिक लूकला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. तिचे चाहते व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्स करून, तिच्याप्रती त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसतायेत. व्हिडिओला आतापर्यंत 26 हजाराहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. तर कमेंट बॉक्समध्ये सोनालीच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले जात आहे.

सोनाली कुलकर्णीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘झिम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही तिच्या खात्यात आहेत.

सोनालीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे म्हणले, तर कारकिर्दीच्या प्रारंभी तिने एक मॉडेल म्हणून काम केले. त्यांनतर केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून तिने चित्रसृष्टीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार देखील देण्यात आला. सोनाली ही मुळची पुण्याची आहे. ती ‘नटरंग’ चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ या लावणीनृत्यासाठी विशेष ओळखली जाते.

हे देखील वाचा