Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

केशरी रंगाचे महत्व सांगत नवरात्रीच्या चौथ्या दिवशी अपूर्वा नेमळेकरचा जगदंबा अवतार

आपला भारत हा विविध सण आणि उत्सव साजरा करणारा देश आहे. प्रत्येक सणाला एक वेगळे महत्व आणि वेगळे वलय आहे. यातीलाच नवरात्र हा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. स्त्री शक्तीचा आदर आणि सन्मान करण्यासाठी विशेषतः हा सण साजरा केला जातो. दुर्गामातेने महिषासुराचा वध करण्यासाठी नऊ दिवस वेगवेगळा अवतार घेतला होता. या प्रत्येक दिवसाला एक वेगळे महत्व आहे. त्यामुळे स्त्रिया प्रत्येक दिवशी असणाऱ्या विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करून फोटो शेअर करत असतात. अशातच मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने यावर्षी एक वेगळा प्रयोग केला आहे. ती दरदिवशी दुर्गामातेने ज्या देवीचे रुप घेतले होते. तसे रूप करून फोटो शेअर करत असते. अशातच तिने चौथ्या दिवसाचा केसरी रंगाचे रूप घेतले आहे.

अपूर्वाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने केशरी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीचा अवतार केला आहे. कपाळी मळवट भरला असून, तसेच सगळे दागदागिने घातले आहेत, आणि केसात गजरे माळले आहेत. (Apurva Nimbalekar share her navratri special photo on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “नवरात्रीचा चौथा दिवस, रंग नारंगी, देवी जगदंबा माता. जगदंबा माता (राशीनची देवी) मुंबई, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या ठिकाणी आहे. देवी यमाई या नावानेही प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना हेमाडपंती आहे. या मंदिरचे बांधकाम, शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. हलती दीपमाला हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. मी आणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.”

तिने केलेला हा प्रयत्न तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहेत अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. तसेच तिने केलेले हे सगळे लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.

अपूर्वा मालिका तसेच चित्रपटात काम करून नावारूपाला आली आहे. खास करून तिची ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता नावाचे पात्र खूप गाजले. या मालिकेने तिला सर्वत्र ओळख निर्माण करून दिली, यासोबत तिने ‘तू माझा सांगाती’ आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकेत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

हे देखील वाचा