नवरात्र जेव्हापासून सुरू झाली आहे, तेव्हापासून अभिनेत्री दररोज देवीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व असणाऱ्या रंगाचे कपडे परिधान करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने यावर्षी एक आगळा-वेगळा प्रयोग केला आहे. दुर्गामातेने महिषासुराचा वध करण्यासाठी या नऊ दिवसात वेगवेगळे अवतार घेतले होते. त्याचप्रमाणे अपूर्वा देवीचे रुप धारण करून सोशल मीडियावर शेअर करत आहे. मागील पाचही दिवस तिने तिचे हे फोटो शेअर केले आहेत. तिने केलेल्या या प्रयोगाला सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच सहाव्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून तिने देवीचे रुप घेतले आहे.
अपूर्वाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. तसेच गळ्यात हार, सगळा साजशृंगार आणि केसात गजरे घातले आहेत. तसेच तिच्या डोक्यावर देखील फुलांची सजावट दिसत आहे. (Apurva Nimbalekar share her navratri special photo on social media)
हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “नवरात्रीचा सहावा दिवस, रंग लाल, देवी एकवीरा देवी. लोणावळ्याजवळील वेहरगाव, कार्ला गडावरील आई एकवीरादेवी ही आदीशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये उमरऋषी परशुरामाची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते.” यासोबतच तिने लिहिले आहे की, “मी आणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.”
तिने शेअर केलेले हे फोटो देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
अपूर्वा मालिका तसेच चित्रपटात काम करून नावारूपाला आली आहे. खास करून तिची ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता नावाचे पात्र खूप गाजले. या मालिकेने तिला सर्वत्र ओळख निर्माण करून दिली, यासोबत तिने ‘तू माझा सांगाती’ आणि ‘सावधान इंडिया’ या मालिकेत काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं स्पृहाचं सौंदर्य, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज
-‘सौंदर्यासाठी लहान कपड्यांची गरज नाही…’, मराठमोळ्या मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत