Wednesday, July 3, 2024

याकारणामुळे दिलीप कुमारचा झाला एआर रहेमान! जाणून घ्या असं काय घडलं होतं…

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक एआर. रहेमान यांना कोणत्याही नव्या परिचयाची गरज नाही. रहेमान यांनी आपल्या कौशल्याने दाक्षिणात्य सिनेमा, बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये ठसा उमटविला आहे आणि स्वतःसोबत देशाची मान देखील अभिमानाने उंचावली आहे. एआर रहेमान यांच्याबद्दल बर्‍याच गोष्टी आहेत ज्या फार कमी जणांना ठाऊक असतील. याचमुळे बोंबाबोंब टीमने आज रहेमान यांच्याबद्दल तुमच्यासाठी काही खास गोष्टी आणल्या आहेत. त्यांचं खरं नाव दिलीप कुमार होतं हे फारच कमी लोकांना माहिती आहे, परंतु त्यांनी ते नंतर बदलललं. त्यांच्या या बदलत्या नावामागे एक रंजक कथा देखील आहे. चला तर मग आज आपण याचबद्दल जाणून घेऊयात.

रहमान केवळ नऊ वर्षांचे होते जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं. रहेमान यांच्या ‘द स्पिरिट ऑफ म्युझिक’ या आत्मचरित्रानुसार, एका ज्योतिषाच्या सल्ल्यामुळे आणि रहमान यांनादेखील आपलं नाव आवडत नसल्याने त्यांनी नाव बदललं. रहमान यांची कुंडली पाहून ज्योतिषाने रहेमान यांच्या बहिणीला त्यांचं नाव बदलण्याचा सल्ला दिला, तेव्हा त्यांनीही तेच केलं. शिवाय रहेमान आधी हिंदू होते, परंतु एक घटनेनंतर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. वास्तविक पाहता , एकदा रहेमान यांची बहीण खूप आजारी होती. रहेमान सर्वत्र बरीच प्रार्थना केली पण त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. मग ते एकदा बहिणीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यासाठी एका मशिदीत गेले आणि सुदैवाने त्याचा परिणाम झाला.

रहेमान या घटनेने प्रभावित झाले आणि त्यांनी आपला धर्म बदलला. रहेमान यांचं बालपण हे फार संघर्षमय होतं, कधीकधी रेकॉर्ड प्लेयर ऑपरेट करण्यासाठी त्यांना ५० रुपये मिळायचे. परंतु आता रहेमान यांना फी म्हणून कोट्यावधी रुपये मिळतात.  रहेमान यांनी संगीतक्षेत्रात जे काम केलं आहे त्याला तोड नाही. त्यांनी लिहिलेली गाणी, त्यांनी दिलेलं संगीत आणि त्यांनी गायलेली गाणी हे सारं निव्वळ अफलातून आहे. त्यांना बालपणी इंजिनियर व्हायचं होतं. परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. रहेमान यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केलं आहे. त्यांना तीन मुलं देखील आहेत.

हे देखील वाचा