बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपल्या हटके डान्सने तिने चाहत्यांना वेड लावले आहे. आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यात कोणतीही कसर सोडत नाही. अशातच आता तिचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिच्यासोबत या व्हिडिओत अभिनेत्रा आणि बिग बॉस फेम शहनाज गिलचा भाऊ आणि पंजाबी गायक शहबाज दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये दोघेही मजेशीर डान्स करताना दिसत आहेत. दोघांची मजा मस्ती पाहून तुम्हीही स्वत: ला हसण्यापासून रोखू शकणार नाहीत.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत तिने शहबाजला टॅग केले आणि लिहिले की, ‘पार्टनर इन क्राईमसोबत.’ व्हिडिओमध्ये जॉर्जियाने निळ्या रंगाचा टी- शर्ट आणि शॉर्ट्स घातले आहेत. दुसरीकडे शहबाजने काळ्या रंगाचा टी- शर्ट, काळ्या रंगाची जीन्स आणि त्यावर जॅकेट घातले आहे. चाहत्यांना त्या दोघांचाही अंदाज खूपच आवडला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, जॉर्जिया आणि शहबाज एका गाण्यात एकत्र दिसणार आहेत. त्याच गाण्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. यापूर्वी शहबाजनेही जॉर्जियासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत दोघेही पोलिसांंच्या भूमिकेत दिसत होते. यावेळी जॉर्जियाच्या हातात बंदूकही होती.
https://www.instagram.com/p/COABsQAhcqR/?utm_source=ig_web_copy_link
शहबाजने व्हिडिओ शेअर करत ‘कमिंग सून, लिटिल स्टार,’ असे लिहिले होते.
जॉर्जियाने ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती शेवटची मिका सिंगसोबत ‘तेरा मस्ताना’ या गाण्यात दिसली होती. जॉर्जिया आता ‘वेलकम टू बजरंगपूर’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेही मुख्य भूमिकेत आहे.
जॉर्जियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर ती अरबाज आणि त्याच्या कुटुंबाच्या खूपच जवळ आहे. अरबाजला जॉर्जियासोबतच्या नात्याबद्दल विचारले असता तो म्हणाला होता की, “मी जॉर्जियाला डेट करत आहे. जर मी ही गोष्ट मान्य नाही केली, तर मी वेडाच असेल. परंतु जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल, की मी लग्न करणार की नाही किंवा करेल तर केव्हा? याबाबत मी काहीच सांगू शकत नाही. जर मला माहिती असेलही तरीही मी तुम्हाला का सांगू? जर मी लग्न करणार असेल, तर तुम्हाला लग्नाचे आमंत्रण नक्की मिळेल किंवा मी घोषणा करेल.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सल्लू प्रेमींसाठी खुशखबर, सलमानच्या नव्या गाण्याला ९ तासांत तब्बल एक कोटी हिट्स
-सोनू सूदसोबत सेल्फी काढायला कोणाला आवडणार नाही ! विमानतळावरील हवाईसुंदरीही निघाली अभिनेत्याची चाहती