बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी चर्चेत असते. जॉर्जिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत असते. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत जोडली गेलेली असते. सध्या जॉर्जिया तिच्या वेळ दुबईमध्ये व्यतीत करत आहे. ती तिच्या या सुंदर ट्रिपचा एकएक क्षण मोबाईलमध्ये कैद करून ठेवत आहे. शिवाय ती अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. नुकताच तिने तिच्या दुबई ट्रिपचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून यात ती उंटावर बसून वाळवंटात फिरत आहे.
जॉर्जियाने तिच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला तिच्या फॅन्सकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहे. या व्हिडिओमध्ये जॉर्जियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून त्यात ती खूप सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला ‘ओ बेटा जी’ हे गाणे देखील वाजत आहे.
जॉर्जिया जेव्हापसून या ट्रीपला गेली आहे, तेव्हापासून ती तिच्या अकाऊंटवरून दुबईचा प्रत्येक क्षण ती तिच्या कॅमेरामध्ये कैद करत फॅन्ससोबत शेयर करत आहे. तिच्या प्रत्येक फोटोला, व्हिडिओला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहे.
जॉर्जियाच्या वर्कफ्रंट बदल बोलायचे झाले तर जॉर्जियाने नुकतेच मिका सिंगच्या ‘रूप तेरा मस्ताना’ या व्हिडिओ अल्बममध्ये काम केले असून हा अल्बम सुपरहिट झाला होता. याशिवाय जॉर्जिया लवकरच अभिनेता श्रेयस तळपदेसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जॉर्जियाने काही दिवसांपूर्वी ‘कैरोलिन अँड कामाक्षी’ या तामिळ वेबसिरीजमध्ये काम केले होते. जॉर्जिया आणि अरबाज खान मागच्या अनेक काळापासून एकमेकांना देत करत आहेत. ते बऱ्याचदा कार्यक्रमांना, पुरस्कार सोहळ्यांना एकत्र दिसत असतात. अरबाजचे सध्याचे वय ५३ वर्ष असून जॉर्जिया ३० वर्षांची आहे.