Monday, July 1, 2024

तुरुंगात असलेल्या अरबाज मर्चंटला वाटतेय आर्यन खानची काळजी; वडिलांना म्हणाला, ‘त्याला एकट्याला सोडून…’

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अद्यापही आर्थर रोड जेलमध्येच आहे. शाहरुखचे शर्थीचे प्रयत्न अद्याप सार्थक होताना दिसत नाहीत. अशात अनेक बॉलिवूड कलाकारांचे आर्यन या सर्वांमधून कधी बाहेर पडणार याकडे लक्ष लागले आहे. या सर्वांमध्ये आता आर्यन आणि अरबाज मर्चंट या दोघांमधील मित्रप्रेम समोर येताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला अरबाजचे वडील असलम मर्चंट यांनी मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी अरबाजला आर्यनची फार काळजी वाटत असल्याचे सांगितले. ट्रायलनंतर ते जेव्हा बाहेर येत होते, तेव्हा त्यांच्यात आणि त्यांच्या मुलामधील संवाद त्यांनी यावेळी सांगितला आहे.

आम्ही एकत्र आतमध्ये आलो आहोत आणि एकत्रच बहेर जाणार
वृत्तपत्राला मुलाखत देत असताना असलम मर्चंट म्हणाले की, “अरबाजने मला सांगितले की, मी आर्यनला एकट्याला जेलमध्ये सोडून नाही जाऊ शकत. त्याला कोणत्याच प्रकारे त्रास व्हायला नको. आम्ही एकत्र जेलमध्ये आलो होतो आणि आम्ही बाहेरही एकत्रच जाणार आहोत.”

अरबाजला आला होता मानसिक झटका
मुलाखतीमध्ये पुढे असलम म्हणाले की, “अरबाजला ६ ते ७ कैद्यांबरोबर ठेवण्यात आले आहे. तेथील वातावरणामुळे त्याला रात्रीचा एक मानसिक झटका देखील आला होता. अरबाज मला म्हणाला होता की, मी हे कुठे येऊन फसलो आहे? माझ्याबरोबर असलेले कैदी कसे आहेत हे मला माहित नाही. माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्राला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळते. जेव्हा जेव्हा तो मला न्यायालयात भेटतो, तेव्हा तेव्हा तो मला फक्त केसविषयीच विचारत असतो. इथे दोन मित्रांना वेगळे केले गेले आहे.”

मंगळवारी (२६ ऑक्टोबर) या विषयी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली, परंतु काहीच माहिती समोर आली नाही. यावर आता पुन्हा बुधवारी (२७ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे. यामध्ये पुढे आर्यन आणि त्याच्या मित्राला बेल मिळणार की नाही यावर निर्णय होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

-कॅन्सरवर उपचार सुरु असताना महेश मांजरेकरांनी केले होते ‘अंतिम’चे शूटिंग,

-आर्यन खान: जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान गर्दीमुळे तुटला कोर्टरूमचा दरवाजा, आज ३ वाजता होईल सुनावणी

हे देखील वाचा