Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

पिझ्झा खाणारी ‘ही’ विचित्र महिला आहे बॉलिवूडची अभिनेत्री, नाव जाणून तुम्हीही व्हाल अचंबित

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांचे वेगवेगळ्या अवतारातील फोटो पोस्ट करत असतात आणि त्यांच्या चाहत्यांना ओळखायला भाग पडतात. मात्र त्यांना तेच चाहते ओळखू शकतात जे बॉलिवूडचे कट्टर चाहते असतात. नुकताच आता एका अभिनेत्रीने तिचा एक फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ती बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असून, तिने एका हॉरर चित्रपटातही काम केले आहे. तिचा परफॉर्मन्स पाहून लाखो चाहत्यांची मने हरपतात. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री.

कोण आहे ‘ही’ अभिनेत्री
फोटोतील स्त्री ओळखू शकता का? चला तुमच्या संयमाची मर्यादा न तोडता, विचित्र दिसणारी स्त्री कोण आहे ते जाणून घेऊया. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ती दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आहे. या फोटोत ती पिझ्झा खाताना दिसत आहे.

बालपणीच ठरवले होते भविष्य
अदा तमिळ पलक्कड अय्यर कुटुंबातील असून, ती मुंबईत लहानाची मोठी झाली आहे. तिने दहावीतच ठरवलं होतं की, तिला अभिनेत्री व्हायच आहे. जेव्हा अदा चित्रपटसृष्टीत प्रवेशासाठी ऑडिशन देत असे तेव्हा तिला नकार मिळत असे. याचे कारण तिचे केस खूप कुरळे होते किंवा निर्मात्यांना वाटत होते की, ती खूप लहान आहे. अदा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. बॉलिवूड चित्रपटांशिवाय ती साऊथच्या चित्रपटांमध्येही काम करत आहे.

अभिनेत्री अदा शर्माने ‘१९२०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती खूप सुंदर आहे पण तिच्या लूकवर खूप प्रयोग करते. अदा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. अदा शर्मा अनेक चित्रपटांमध्ये दिसली नाही, पण तिची ‘१९२०’ चित्रपटातील इमेज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ‘१९२०’ व्यतिरिक्त अदा शर्मा ‘हसी तो फसी’, ‘कमांडो २’ आणि ‘कमांडो ३’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे

हे देखील वाचा