Sunday, June 1, 2025
Home अन्य ‘…तुझ्याकडे एवढेच कपडे शिल्लक आहेत का?’ निया शर्माच्या बोल्ड फोटोशूटवर संतापले नेटकरी

‘…तुझ्याकडे एवढेच कपडे शिल्लक आहेत का?’ निया शर्माच्या बोल्ड फोटोशूटवर संतापले नेटकरी

अभिनेत्री निया शर्मा छोट्या पडद्यावरील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या हॉट लूकमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. कधी बॅकलेस टॉप, तर कधी निया तिच्या बिकिनी फोटोशुटमुळे सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. यावेळी नियाने तिची इंस्टाग्राम अकांउटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र, त्यावरून युजर्स चांगलेच संतापले आहेत.

नियाने तिच्या इंस्टाग्राम अकांउटवरुन शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाचा टॉप घातला आहे. तसेच फाटलेली जीन्स घातलेली आहे. यातील तिचा लूक अतिशय बोल्ड आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निया तिच्या बोटांवर गुलाबी रंगाची नेलपेंट लावत आहे. तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. तर तिने न्यूड मेकअप केला आहे. यात ती अतिशय बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहे.

हा बोल्ड व्हिडिओ पाहिल्यानंतर, काही चाहते नियाच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत, तर काहीजण तिला ट्रोल करत आहेत. काही युजर्स नियाचा लूकला  खूप पसंती दर्शवत आहेत, ते तिला हॉट म्हणत आहेत. तर काहीजण तिच्या कपड्यांवरून तिला बरंच खरंखोटं सुनावताना दिसत आहेत. एका युजरने नियाला, ‘तू भारतीय संस्कृतीचा अपमान करत आहेस’ असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर ‘तुझ्याकडे एवढेच कपडे शिल्लक आहेत का?’ असेही युजर्स तिला विचारत आहेत. नियाने घातलेल्या जीन्सवर एक युजर म्हणाला की, ‘तू जीन्सचे बटण लावायचे विसरली का?’

दरम्यान, निया शर्माचे खरे नाव नेहा शर्मा आहे. तिने २०१० मध्ये टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ‘काली – एक अग्निपरीक्षा’ या मालिकेद्वारे पदार्पण केले. ‘एक हजारों में मेरी बेहना है’, ‘जमाई राजा’, ‘इश्क में मरजावा’ आणि ‘नागिन ३’ या तिच्या हिट मालिका आहेत. निया शर्मा शेवटच्या वेळी ‘लेडीज विर्सेज जेंटलमन’ या टीव्ही शोमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा