Tuesday, July 9, 2024

अरे व्वा! अर्जुन कपूर झालाय गर्लफ्रेंड मलायकाचा शेजारी; अभिनेत्याच्या आलिशान घराची किंमत वाचून फिरतील डोळे

प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात महत्त्वाची स्वप्नं असतात. त्यातील एक म्हणजे चांगली नोकरी आणि दुसरं म्हणजे स्वतःचं घर. सामान्य व्यक्ती काय पण अगदी बॉलिवूड मधील कलाकारांचे देखील हेच स्वप्न असते की, ते स्वतःच्या कमाईने त्यांचं घर घेऊ शकतील. या वर्षी बॉलिवूडमधील आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, सनी लिओनी यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केले आहे. आता या यादीत अभिनेता अर्जुन कपूरचे नाव देखील सामील झाले आहे. त्याने 4 बीएचके आलिशान घर खरेदी केले आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा कधी त्याच्या चित्रपटामुळे, तर कधी त्याच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो आता मलायका अरोराचा शेजारी झाला आहे. त्याने वांद्रे येथील 81 ऑरिएट या बिल्डिंगमध्ये एक सुंदर घर खरेदी केले आहे.

याबाबत त्याच्याकडून अजुन कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. हाती आलेल्या माहितीनुसार, अर्जुनने वांद्रे परिसरात एका आलिशान बिल्डिंगमध्ये 4 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे.

त्याच्या या व्हिलामध्ये 10 हाय स्पीड आणि 4 पर्सनलाइज्ड सी फेसिंग कॅप्सूल लिफ्ट, पूल, जिम, पेट कॉर्नर, लायब्ररी, प्ले एरिया यांसारख्या अनेक गोष्टी आहेत. याची किंमत 20 ते 25 कोटी एवढी सांगितली जात आहे.

अर्जुन कपूरच्या‌ कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो नुकताच ‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटात दिसला आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंग आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत होत्या. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला होता. यासोबतच तो ‘संदीप और पिंकी फरार’मध्ये देखील दिसला होता. यामध्ये परिणीती चोप्रा त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा