Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड बॉडीशेमिंग करणाऱ्या ट्रोलरला अर्जुन कपूरने दिले सणसणीत उत्तर, म्हणाला…

बॉडीशेमिंग करणाऱ्या ट्रोलरला अर्जुन कपूरने दिले सणसणीत उत्तर, म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कमालीचा चर्चेत येत असतो. मागच्याच महिन्यात तो त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला होता. जवळपास दोन वर्षांपासून अर्जुन कपूर त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. नुकताच अर्जुन कपूरने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो मोमोज खाताना दिसत आहे. त्याच्या या फोटोवर अर्जुनला खूपच ट्रोल केले जात असून, त्याला बॉडीशेमिंगचा सामना करावा लागत आहे. या ट्रोलिंगवर अर्जुन कपूरने ट्रॉलर्सला सणसणीत उत्तरं दिले असून, त्याला पाठिंबा देताना मलायका अरोरा आणि अनुष्का शर्मा यांनी देखील पोस्ट शेअर केली आहे.

 

एकीकडे त्याचा हा फोटो खूपच व्हायरल होत असून, त्याचा हा फोटो अनेकांना आवडत आहे. तर दुसरीकडे त्याचा फोटो ट्रोलर्ससाठी खाद्य बनला आहे. अर्जुनच्या या फोटोवर ट्रॉलर्सने लिहिले, “हा मुलगा कधीच शेपमध्ये येऊ शकत नाही. हा एक श्रीमंत मुलगा आहे ज्याची कोणतीच मानसिकता नाही.” यावर अर्जुन कपूरने उत्तरं देताना या कमेंटचा स्क्रिनशॉट घेत तो त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीला ठेवला असून, त्यावर लिहिले, ” हे त्या लोकांच्या टिपणी आणि विचार प्रक्रियांच्या कारणामुळे आहे, जे अशा पद्धतीच्या कीबोर्डच्या मागे लपून असतात. जगाला नेहमीच असा विश्वास दिला जातो की, फिटनेस सर्वात चांगला दिसणाऱ्या बॉडीसाठीच आहे अजून काही नाही. कोणालाच फिटनेस यापेक्षा अधिक नाही. ज्याने कधी सामान्य स्वस्थ जीवन जगण्यासाठी संघर्ष केला. मानसिक रूपात आनंद आणि शांत राहण्यासाठी स्वतःची काळजी घेतली आणि सर्वात चांगले करत अनेक समस्यांना पार करून नियमित डीपी साठी नाही तर एक दिनचर्या म्हणून ठेवले.”

अर्जुन कपूरच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास सध्या तो मोठ्या पडद्यापासून लांब आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे. त्याच्या आणि मलायका अरोराच्या लग्नाच्या चर्चा देखील मधल्या काळात जोर धरून होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा