अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांची प्रेमकथा सध्या हिंदी सिने जगतात सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच अर्जुन कपूर आणि मलायकाने परदेशात अर्जुनचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. यावेळचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार झाले होते. परंतु सध्या अर्जुन कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे जो पाहून मलायकाचा पारा वाढेल अशीच चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. काय आहे हा व्हिडिओ चला जाणून घेऊ.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या डॅशिंग स्टाइलसाठी खूप प्रसिद्ध आहे. कलाकार अनेकदा त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि चित्रपट कलाकारांसोबत मस्ती करताना दिसतात. सध्या अर्जुन कपूर तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानीसोबत त्याच्या आगामी ‘एक व्हिलन 2’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. अशा परिस्थितीत हे स्टार्स नुकतेच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये स्पॉट झाले. येथून अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो जोरदार व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर तारा सुतारियाला चिडवताना दिसत आहे. तारा थोडी गोंधळलेली दिसत होती. वास्तविक, यावेळी तारा सुतारियाने खूपच लहान ड्रेस परिधान केला होता, अशा परिस्थितीत अर्जुन जेव्हा तिच्यासोबत पापाराझींसमोर मजा करत असतो तेव्हा ती थोडी अस्वस्थ वाटत असते. मात्र, त्यानंतर परिस्थिती हाताळताना तिने अर्जुन कपूरसोबत पापाराझींनाही पोज दिली.
View this post on Instagram
तारा सुतारिया आणि अर्जुन कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटिझन्स हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत आणि संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. अर्जुन आणि ताराची ही केमिस्ट्री सर्वच चाहत्यांना आवडली असतानाच अर्जुन कपूरने तारा सुतारियासोबत अशी जबरदस्ती केली नसावी असे काहींचे म्हणणे आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
‘पैसे मिळायचे पण…’ कपिल शर्मा शो सोडण्याचे कारण सांगताना हे काय बोलून बसली उपासना सिंग
वैवाहिक आयुष्यात आयुष्मान खुराना नाही सुखी म्हणाला ‘लग्न माझ्या आयुष्यातील मोठी चूक’