Monday, February 26, 2024

मलायकाने अर्जुनला लग्नासाठी दिला होकार! अभिनेत्रीने केलेल्या पोस्टवर ‘या’ स्टार्सने दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे, नुकतेच गायिका पलक मुच्छालने मिथुनसोबत लग्न केले. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या अविवाहित जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर(Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora). बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असलेले अर्जुन आणि मलायका त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात आता मलायकाने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे हे दोघेही लवकरच विवाह बंधनात अडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी त्यांचे नाते जगासमोर आणले आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण ते लग्न करणार का, या प्रश्नावर अर्जुन आणि मलायका अनेकदा मौन बाळगतात. मलायका अरोराच्या नवीन इंस्टाग्राम पोस्टने या जोडीच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. मलायका अरोराने इंस्टाग्रामवर अशी पोस्ट केली आहे, ज्यामुळे मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार आहेत का, असा प्रश्न लोकांना पडला आहे.

 

View this post on Instagram

 

मलाईका अरोराने आपल्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. परंतु यावेळी तिने दिलेले कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे. ‘I said YES’ असं कॅप्शन देत मलायकाने हार्ट इमोजी टाकत आपला फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या फोटोवर अभिनेता करण टक्करने ‘वाह वाह.. वाह वाह’ अशी कमेंट केली आहे. त्यासोबतच अभिनेत्री शमिता शेट्टीने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तन्नाज इराणी, शमिता शेट्टी, माही विज आणि अदिती गोवित्रिका या कलाकारांनी मलायकाच्या पोस्टला कमेंट करुन मलायकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

या पोस्टमध्ये मलायकाने स्पष्टपणे काही सांगितलेले नसले तरी फॅन्सने मात्र अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाला दुजोरा देत दोघांनाही शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. अभिनेता अरबाज खान पासून २०१७ मध्ये वेगळं झाल्यानंतर मलायका आणि अर्जुनच्या रिलेशनच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दोघांनी याबाबत कधीही स्पष्टपणे भाष्य केलं नाही. आताही मलायकाने स्पष्टपणे काहीही म्हटलेलं नसताना दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

2019 मध्ये त्यांच्या नात्याची घोषणा केली होती
अर्जुन कपूर मलायका अरोरासोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांना अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले आहे. मलायकाने 2019 मध्ये अर्जुनसाठी रोमँटिक वाढदिवसाची पोस्ट शेअर करून अधिकृतपणे तिच्या नात्याची घोषणा केली. तेव्हापासून, ते प्रमुख जोडप्यांचे लक्ष्य सेट करण्याची संधी कधीही सोडत नाहीत. अनेकदा दोघेही आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.(arjun kapoor malaika arora wedding actress shared a post with her photo write yes)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रिया कपूनने ‘द क्रू’ चित्रपटाची केली घोषणा; करिना,तब्बू अन् क्रिती साकारणार प्रमुख भूमिका

ट्रान्सजेंडरची भूमिका निभावून मिळवली ओळख, पहिल्याच भेटीतच आशुतोष राणांच्या नजरेत भरली होती रेणुका शहाणे

हे देखील वाचा