अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि डॅशिंग लूकने त्याने हिंदी सिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्पावधीत अर्जुन कपूरने सिने जगतात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या त्याचा एक विलेन रिटर्न चित्रपट सिनेमागृहात जोरदार धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरमधील सर्वात खास चित्रपटाची आठवण सांगितली आहे. कोणता आहे तो चित्रपट चला जाणून घेऊ.
अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या ‘इश्कजादे’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटातील अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या जोडीचे जोरदार कौतुक झाले होते. इश्कजादे नंतर अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले परंतु त्या चित्रपटांची एवढी चर्चा झाली नाही. सध्या अर्जुन कपूरचा एक विलेन रिटर्न चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या निमित्ताने एका मुलाखतीत अर्जुन कपूरने की अँन्ड का चित्रपटाला त्याच्या आयुष्यातील सर्वात खास चित्रपट असल्याचे सांगितले आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना अर्जुन कपूरने सांगितले की, “या चित्रपटाला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद जोरदार होता. या चित्रपटात मी साकारलेली भूमिका खूपच आव्हानात्मक होती. कारण या चित्रपटात मला एक्शन हिरो म्हणून संधी मिळाली होती.ही भूमिका माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा जास्त वेगळी आणि आव्हानात्मक होती.
दरम्यान या चित्रपटात अर्जुन कपूरने अभिनेत्री करीना कपूरसोबत भूमिका साकारली होती. चित्रपटात दोघांचा जोरदार रोमान्स पाहायला मिळाला होता. दरम्यान अर्जुन कपूरच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर अर्जुन कपूर लवकरच अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत द लेडी किलर या चित्रपटात झळकणार आहे. त्याचबरोबर विशाल भारद्वाजच्या कुत्ते चित्रपटातही तो भूमिका साकारताना दिसणार आहे.
हेही वाचा –
जेव्हा भर रस्त्यात नाचायला लागली होती सारा अली खान, भिकारी समजून लोकांनी टाकले होते पैसे
दो दिल एक जान! बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांची मैत्री आहे सर्वात खास
आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्डा’वर अन्नू कपूर यांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ‘तो कोण आहे?’