Tuesday, January 27, 2026
Home बॉलीवूड ‘….मर्यादा ठरवावी लागते!’ मलायकाच्या भूतकाळावर उघडपणे बोलला अर्जुन कपूर

‘….मर्यादा ठरवावी लागते!’ मलायकाच्या भूतकाळावर उघडपणे बोलला अर्जुन कपूर

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या ‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटाविषयी चर्चेत आहे. तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच अर्जुन कपूरने या आगामी चित्रपटासंदर्भात एक मुलाखत दिली होती, ज्यात तो मलायकाच्या भूतकाळाविषयीही बोलला होता.

मलायकाबद्दल विचारला गेला प्रश्न
एका मुलाखतीत जेव्हा अर्जुन कपूरला मलायका अरोरासोबतच्या त्याच्या संबंधाबद्दल विचारले गेले, तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की, वैयक्तिक आयुष्याविषयी बोलणे त्याला आवडत नाही. यासह तो असेही म्हणाला की, एखाद्या नात्यात जोडीदाराचा आदर करणे आवश्यक असते.

मलायकाच्या भूतकाळाबद्दल बोलला असे
पुढे बोलताना अर्जुन म्हणाला की, “हो प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो आणि जेव्हा या गोष्टी सार्वजनिक केल्या जातात, तेव्हा नेहमीच ते चांगले नसते. आपल्या नात्यांचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होतो.” अर्जुन कपूर असेही म्हणाला की, “मी नेहमीच आमच्या दोघांमध्ये आदरयुक्त संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मी तेच करतो ज्याने तिला आरामदायक वाटेल. माझ्या कारकिर्दीवर या नात्याचा परिणाम होणार नाही. यासाठी तुम्हाला एक मर्यादा ठरवावी लागते. मी आणि मलायका आमच्या नात्याला वेळ देतो.”

‘सरदार का ग्रँडसन’
‘सरदार का ग्रँडसन’ या चित्रपटात अर्जुन कपूर व्यतिरिक्त नीना गुप्ता, रकुल प्रीत सिंग हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक काशिव नायर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्याचवेळी या चित्रपटात जॉन अब्राहम आणि आदिती राव हैदरी केमिओच्या रोलमध्ये दिसणार आहेत.

तसेच, मलायका अरोरा नेहमी अर्जुनसोबत फिरताना दिसते. तिचे पहिले लग्न अरबाज खानशी झाले होते, त्याच्याकडून तिला अरहान खान नावाचा एक मुलगाही आहे. मलायका आणि अरबाजचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपूर बहिणींनी शेअर केला आजी- आजोबांचा फोटो; पाहून तुम्हीही म्हणाल ‘एकच नंबर’

-‘भाभी जी घर पर है’मधील नवीन ‘गोरी मेम’ सोडतेय मालिका? नेहा पेंडसेने सांगितले सत्य

-गुणी मुलगी! आपल्या वडिलांची ‘ही’ इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीति झिंटाने खरेदी केली होती आयपीएल टीम

हे देखील वाचा